पटवर्धन हायस्कूलचे यश

पटवर्धन हायस्कूलचे यश

Published on

-rat१८p२१.jpg-
२५N९२३७३
रत्नागिरी : कोकणीगीताच्या विश्वविक्रमात सहभागी पटवर्धन हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी.
----
कोकणीगीताच्या विश्वविक्रमात
पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक
रत्नागिरी : कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानात कोकणीगीतांचा विश्वविक्रम झाला. यात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे कोकणी भाषेत पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ८१ विद्यार्थी व शिक्षक कलाकारांनी भाग घेतला. गायक संगीतकार कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्यावतीने देशातील २० भाषांमध्ये १५०० गायकांनी हम भारत के लोग है। संविधानाच्या प्रास्ताविकेचे कोकणी भाषेत गीतगायन केले. पटवर्धन हायस्कूलमधील शिक्षक कोकणी संविधान गीताचे गटप्रमुख पंडित राठोड, सहगटप्रमुख प्रा. मानसी चव्हाण, प्रा. तानाजी वाघमारे, प्रा. वर्षा जोशी, प्रा. शुभांगी शिंदे व प्रा. शीतल रोकडे आणि प्रशालेतील संगीतशिक्षक संकेत पाडळकर व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. भारत शिक्षण मंडळ पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर व सर्वांनी यांचे कौतुक केले.

-rat१८p२२.jpg-
P२५N९२३७४
रत्नागिरी : भाट्ये किनाऱ्यावर कचरा गोळा करून स्वच्छता करणारे डीजीके महाविद्यालयाचे विद्यार्थी.

डीजीके महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
केली भाट्ये किनाऱ्याची सफाई
रत्नागिरी ः येथील देव, घैसास, कीर महाविद्यालयामधील (डीजीके) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. या वेळी वनविभागातील कर्मचारी, जलजीविका संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २५ स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. संपूर्ण भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या अभियानास जलजीविका संस्थेचे चिन्मय दामले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथिला वाडेकर उपस्थित होत्या.


जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे
जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत यश
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धा गुहागर येथे झाल्या. त्यात सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. यात लावण्या इंदुलकर, विघ्नेश कांदर, उत्तरा कदम, शौर्य पाले, आस्था बहुतुले या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मुख्याध्यापिका संजना तारी यांनी या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.


-rat१८p२५.jpg-
२५N९२३८७
तबस्सुम खाचे
राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या
समन्वयकपदी तबस्सुम खाचे
साखरपा ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा कार्यकारिणी आणि समन्वयकपदी पाटगाव येथील तबस्सुम खाचे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. खाचे या पाटगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत.


-rat१८p२६.jpg-
२५N९२३८८
लांजा ः कथाकथन स्पर्धेतील पारितोषिक स्वीकारताना पूर्वा आठल्ये.

कथाकथन स्पर्धेत आई प्रथम, कन्या तृतीय
साखरपा ः वेरवली (ता. लांजा) येथे आयोजित कथाकथन स्पर्धेत कोंडगाव येथील हर्षा आठल्ये यांनी खुल्या गटात प्रथम तर माध्यमिक गटात त्यांची कन्या पूर्वा हिने तृतीय पारितोषिक पटकावले. वेरवली येथील श्रीराम विद्यालय आणि कोळवणकर मोटर ट्रेनिंग स्कूलतर्फे स्व. रमेश धोंडू डोळस स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत माध्यमिक गटात कोंडगाव येथील तु. ग. गांधी विद्यालयातील विद्यार्थिनी पूर्वा आठल्ये हिने तृतीय क्रमांक पटकावला. खुल्या गटात तिची आई आणि कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या हर्षा अनिरुद्ध आठल्ये यांनी कथाकथन करत प्रथम क्रमांक पटकावला. आठल्ये मायलेकींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com