संक्षिप्त
निवृत्त कर्मचाऱ्यांची
देवरुखात सभा
साडवली ः देवरूख येथील राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांची सभा प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही सभा प्रकाश बोथले यांच्या निवासस्थानी दत्तनगर येथे घेण्यात आली. संघटनेचे सचिव प्रकाश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघटनेचे ज्येष्ठ सभासद अभय पुरोहित यांनी शंख वाजवून अनोख्या पद्धतीने सर्वांचे स्वागत केले गेले. संघटनेचे ज्येष्ठ सभासद हाजू नेवरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी केशव नार्वेकर, पांडुरंग फाटक, प्रकाश बोथले, नंदकुमार बोथले, संजय वेल्हाळ आदी उपस्थित होते. सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासदांना शुभेच्छा देण्यात आल्या.
पांगरे बुद्रुकमध्ये
महिला सुरक्षेवर जागृती
राजापूर ः राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रूक येथील ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची सुरक्षा आणि पीडित भरपाई योजना या विषयावर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख सचिव आर. आर. पाटील, बालसंरक्षण अधिकारी प्रदीप मांडवकर, राजापूर गटविकास अधिकारी तुकाराम जाधव तसेच अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका, पांगरे बुद्रूक ग्रामस्थ उपस्थित होते.
ओबीसी बांधवांची
आज राजापुरात बैठक
राजापूर ः राजापूर तालुक्यामध्ये ओबीसी संघटन अधिक मजबूत करणे आणि सध्या सुरू असलेले ओबीसी आरक्षण अधिक तीव्र करणे या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता.२०) सकाळी १०.३० वा. तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर तालुका ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष महेश शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहामध्ये ही सभा होणार आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.