जिल्ह्यात ५०१ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना

जिल्ह्यात ५०१ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना
Published on

-rat१९p१४.jpg-
२५N९२६२१
रत्नागिरी ः नवरात्रोत्सव दोन दिवसांवर आल्याने अक्षय पिलणकर यांनी साकारलेल्या देवींच्या मूर्ती.
------
नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज
सोमवारपासून दुर्गामातेचा जागर ; ५०१ ठिकाणी प्रतिष्ठापना, तरुणाई थिरकणार नृत्याच्या तालावर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर आता सर्व भक्तांना नवरात्रीची आतुरता लागली आहे. नवरात्रोत्सवाला येत्या सोमवारपासून (ता. २२) सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक व ६५ खासगी मिळून ५०१ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. नवरात्रानिमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठाही सजू लागल्या आहेत. दुर्गामातेची आरास करण्यासाठी लागणारे विविध साहित्य, नऊ रंगाच्या साड्या, गरबा, दांडियांसाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे.
नवरात्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, मूर्तिकारांकडून दुर्गादेवी मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नऊ दिवसांच्या उत्सवाची सांगता दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमी-दसऱ्याला होते. जिल्ह्यात ४२४ सार्वजनिक ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे तर १९ हजार ३१५ ठिकाणी खासगी घट बसवण्यात येणार आहेत.
यावर्षी घटस्थापनेपासून अकराव्या दिवशी दसरा आहे. या निमित्त ग्रामीण भागातील विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे मंडळांकडून दांडिया-गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. गाणी आणि नृत्याच्या तालावर तरुणाई थिरकणार आहे. दुकानांतून दांडिया खेळण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक दांडिया, गुजराती, राजस्थानी पोषाख, बांगड्या, ज्वेलरी विक्रीस आले आहेत. उत्सवमंडळे सज्ज झाली आहेत.

चौकट
या नऊ रंगांना विशेष महत्त्व
नवरात्रोत्सवात नऊ रंगांना विशेष महत्त्व दिले जाते. या दिवसात केशरी, पांढरा, लाल, हिरवा, निळा, पिवळा, राखाडी, जांभळा, मोरपंखी रंगाच्या साड्यांचा वापर प्रत्येक दिवशी केला जातो. महिलावर्गामध्ये खास आकर्षण असते. यासाठी प्रत्येक दिवशी या रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात. महिलांनी तयारी सुरू केली असून, बाजारपेठेत नवीन साड्या खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com