देवगड पोलिस ठाण्यातील गणरायाला उत्साहात निरोप
92630
देवगड पोलिस ठाण्यातील
गणरायाला उत्साहात निरोप
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः येथील पोलीस ठाण्यातील गणपतीचे काल (ता.१७) २३ दिवसांनी थाटात विसर्जन झाले. पाऊस असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. दरम्यान, दुपारी तहसीलदार रमेश पवार, उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. दुपारी महाप्रसादाचेही वाटप झाले.
तालुक्यात ठिकठिकाणी २७ ऑगस्टला घरोघरी श्री गणरायाचे आगमन झाले होते. त्यातील काही गणपतींचे दीड, पाच, गौरी गणपती, अनंत चतुर्दशीला विसर्जन झाले. काही गणपतींचे १७ आणि २१ दिवसांनी विसर्जन करण्यात आले. काल २३ दिवसांनी येथील पोलिस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. आज सायंकाळी पावसाने जोर धरल्याने विसर्जन मिरवणूक काढण्यात अडचणी आल्या. पावसामुळे सायंकाळी उशिरा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. तहसीलदार रमेश पवार, उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक महेश देसाई, विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, महसूल कर्मचारी दीपक पावसकर, पंचायत समिती कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्यासह पोलिस कर्मचारी, पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. घाटे यांनी गुलाबपुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले. दुपारी महाप्रसादाचेही वाटप झाले. सायंकाळी विसर्जन मिरवणूक काढली होती.