शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करा

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करा

Published on

शासकीय वसतिगृहातील
प्रवेशसाठी अर्ज करा
रत्नागिरी ः सामाजिक न्यायविभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या वेबसाइटवर आपला ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन समाजकल्याण साहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी प्रत्येक वसतिगृहाच्या नोटीस फलकावर निवड झालेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींची नावे प्रसिद्ध करण्यात येतील. स्वाधार योजनेसाठीसुद्धा वरील वेबसाइटवर अर्ज करता येणार आहे.

पणजीत ३० ला
डाक अदालत
रत्नागिरी ः पणजी येथील पोस्टमास्तर जनरलतर्फे ३० सप्टेंबरला क्षेत्रीय स्तरावरील ६३वी डाक अदालत सकाळी ११ वाजता पणजी येथील कार्यालयात आयोजित केली आहे. संबंधितांनी डाकसेवेबाबतची तक्रार साहाय्यक निदेशक १, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी ४०३००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह २० पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशारीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक यांनी कळवले आहे.

निकम विद्यालयाचा
संघ विभागासाठी पात्र
सावर्डे ः जिल्हास्तरीय शालेय १४ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात सावर्डेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात दापोली संघावर नऊ गुणांनी मात करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत जिल्ह्यातील नऊ संघ सहभागी झाले होते. विद्यालयाचे खेळाडू अथर्व घाणेकर, समर्थ घाणेकर, संस्कार घाणेकर, श्रेयश कातकर, मानव भुवड, ध्रुव घाणेकर, दीपराज चाळके, ओम घाणेकर, आर्यन घाणेकर, आर्यन यादव, आयुष राडे व सार्थक म्हादे यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. या खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

विजय बेर्डे, देवगोजी
यांचा गौरव
लांजा ः लोकमान्य वाचनालय, लांजा या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचनालयाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याबद्दल लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार व माजी उपाध्यक्ष विजय बेर्डे, डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल संस्थेच्या संचालिका डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांना गौरवण्यात आले. वाचनालयाचे उत्कृष्ट क्रियाशील वाचक म्हणून दीपा शेटये व बालवाचक वैदेही बाणे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अॕड. अभिजित जेधे यांचे अध्यक्षतेखाली वाचनालयात झाली. या वेळी संस्थेचे कार्यवाह उमेश केसरकर, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, विजय बेर्डे, विलास कुवळेकर, सदानंद देशमुख, विजय खवळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com