तळवणेत २२ पासून विविध कार्यक्रम

तळवणेत २२ पासून विविध कार्यक्रम

Published on

तळवणेत २२ पासून
विविध कार्यक्रम
आरोंदा : तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सवानिमित्त २२ सप्टेंबरपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रम असे ः २२ ला पूजन व घटस्थापना, रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा. २३ ला रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा नाट्यप्रयोग. २४ ला महिलांचे हळदीकुंकू, समई नृत्य, तालुकास्तरीय फुगडी जुगलबंदी. २५ ला वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, वालावल यांचा प्रयोग. २६ ला तालुकास्तरीय दांडिया नृत्य
२७ ला वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा प्रयोग. २८ ला डबलबारी भजन सामना (बुवा कु. रिया मेस्त्री व बुवा सौ. साची मुळम). २९ ला रांगोळी स्पर्धा व रामकृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुलाची ‘स्वरसंध्या’. ३० ला शारदोत्सव, सरस्वती पूजन व सांस्कृतिक कार्यक्रम. १ ऑक्टोबरला रवळनाथ, गुरुकृपा, कृष्णप्रिया व जय गणेश भजन मंडळांचे भजन सादरीकरण. २ ऑक्टोबरला सत्यनारायण महापूजा, वारकरी भजन, श्री देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग. दररोज सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ, तळवणे व ग्रामस्थांनी केले आहे.
-----------------
शिधापत्रिका धारकांना
ई-केवायसीचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत शिधापत्रिका ऑनलाईन करण्याची प्रक्रिया मंगळवार (ता.३०) पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक असून त्याची पूर्तता न झाल्यास धान्याचा लाभ थांबणार आहे. या अनुषंगाने सर्व तहसीलदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव धान्य दुकानदारांकडे जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा लावून प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जर ई-केवायसी नाकारली गेली असेल तर आधारकार्डसह तहसील कार्यालयात जाऊन आरसीएमएसमधील माहिती दुरुस्त करावी. याशिवाय, घरबसल्या सोयीसाठी केंद्र सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप सुरू केले असून त्याद्वारे देखील शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करता येणार आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचेही आवाहन केले आहे.
--
गोळवण-कुमामेत
आज आरोग्य शिबिर
मालवण ः टेलीमेडिसिन सेंटर आयुष्मान आरोग्य केंद्र, गोळवण व ग्रामपंचायत गोळवण-कुमामे डिकवल यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता.२०) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाइन मार्गदर्शन, रक्तदाब व मधुमेह तपासणी, मोफत औषधे तसेच विविध रक्त तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असून, सर्व ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com