निवतीत साकारणार जलपर्यटन प्रकल्प
92662
निवतीत साकारणार जलपर्यटन प्रकल्प
सहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश; ‘गुलदार’च्या रूपाने पूर्ण होणार स्वप्न
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून सिंधुदुर्गातील निवती येथे जलपर्यटन प्रकल्प सुरु होत आहे. तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर गुलदार युद्धनौका आणि पाणबुडीच्या रूपाने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.
तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग बंदरात उभी असलेल्या निवृत्त युद्धनौका गुलदारला भेट दिली. यावेळी सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, शुभम झाट्ये, मनोज खोबरकर, राजन कुमठेकर, केदार झाड, संदीप बोडवे, मिथिलेश मिठबावकर, दर्शन वेंगुर्लेकर, हर्षल गंबीरराव, राजेश कुंटे, अभय पाटकर, पंकज धुरी, विकास ताम्हणकर, मुकेश आचरेकर, प्रसाद भोजने यांसह अन्य उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटनस्थळाचे केंद्र बनणार आहे. कोकणातील पर्यटनक्षेत्र अधिक सक्षम होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे कोकण फक्त निसर्गसंपन्न नसून पर्यटनाच्या दृष्टीने देखील अधिक सक्षम होईल. यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल केंद्र आणि महाराष्ट्र सरकार बरोबरच भारतीय नौदलाचे मनःपूर्वक आभार, असे श्री. खानविलकर यांनी सांगितले.
---
योगदान देणाऱ्यांचा गौरव
या प्रसंगी गुलदार युद्धनौकेचा प्रकल्प निवती येथे पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आणि दिलेल्या योगदानाबद्दल संदीप बोडवे यांचा तारकर्ली पर्यटन विकास संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षल गंबीरराव, उद्योजक केदार झाड यांचाही सत्कार झाला. सिंधुदुर्गातील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी अहोरात्र झटणारे तसेच सिंधुदुर्गातील नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार सागरी पर्यटनासाठी मोठी मेहनत घेणारे डॉ. सारंग कुलकर्णी, नाशिक बोट क्लबचे व्यवस्थापक धीरज चोपडेकर, इसदाचे व्यवस्थापक सूरज भोसले, स्कुबा प्रशिक्षक घनश्याम मोरजे, सहकारी संकेत गावडे यांचेही यावेळी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.