रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली येथील शालेय सायकलपटूंचा वरचष्मा

रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली येथील शालेय सायकलपटूंचा वरचष्मा

Published on

-rat१९p१६.jpg-
P25N92648
डेरवण : शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेतील यशस्वी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य शमिका खानविलकर व रुद्र जाधव.
-------
ट्रॅकवर उमलली सायकलिंगची नवी पिढी
डेरवणमध्ये स्पर्धा ; रूद्र, वरद, शमिका, पियुष, दिशांत चमकले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा काल (ता.१९) डेरवण येथील क्रीडा संकुलात झाल्या. यात वेगवेगळ्या गटांमध्ये रुद्र जाधव, वरद कदम, शमिका खानविलकर, पियुष पवार व दिशांत पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
यात १४ वर्षाखालील टाइम ट्रायल प्रकारात मुलांमध्ये रत्नागिरीच्या रुद्र जाधव याने प्रथम क्रमांक तर चिपळूणच्या मिथिल टाकळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील टाइम ट्रायल प्रकारात मुलांमध्ये दापोलीच्या वरद कदम याने प्रथम क्रमांक तर चिपळूणच्या ईशान वझे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील टाइम ट्रायल प्रकारात मुलींमध्ये रत्नागिरीच्या शमिका खानविलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. १७ आणि १४ वर्षाखालील मास स्टार्ट प्रकारात खेड येथील अनुक्रमे पियुष पवार व दिशांत पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
वडील आणि खेड सायकलिंग क्लबचे मार्गदर्शन पियुष आणि दिशांतला लाभले. रुद्र जाधव आणि शमिका खानविलकर यांना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे फाउंडर मेंबर दर्शन जाधव आणि विनायक पावसकर याचे मार्गदर्शन लाभले. कोकणात सायकलिंगची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीनिवास आणि धनश्री गोखले यांचे मोलाचे मार्गदर्शन ईशान वझेला मिळाले.

चौकट १
पालकमंत्र्यांनी दिलेल्या सायकलचा उपयोग
स्पर्धेमध्ये चांगली सायकलदेखील तितकीच महत्त्वाची असते. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून समाजातील कुशल आणि पात्र सायकलिस्टना वापरता यावी म्हणून चांगली रेसर सायकल उपलब्ध करून दिली. आज रुद्र जाधव याने हीच रेसर सायकल स्पर्धेमध्ये वापरली आणि प्रथम क्रमांक पटकावला.

Marathi News Esakal
www.esakal.com