विरोधानंतरही पेढांबे-खडपोलीतून अवजड वाहतूक सुरू

विरोधानंतरही पेढांबे-खडपोलीतून अवजड वाहतूक सुरू

Published on

-ratchl१९३.jpg ः
P२५N९२६९२
चिपळूण ः खडपोली येथे रस्त्याची पाहणी करताना प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ.
----
पेढांबे-खडपोलीवरील अवजड वाहतूक सुरू
काही शेतकऱ्यांचा विरोध ; प्रांतांकडून पाहणी, उद्योजकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पेढांबे ते खडपोली मार्गावरील अवजड वाहतुकीला काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता; मात्र प्रशासनाकडून तो विरोध मोडीत काढण्यात आला. या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून १४ चाकी ३० टनी गाड्यांची वाहतूक सुरू केली जाणार आहे.
तालुक्यातील पिंपळी येथील जूना पुल खचल्यानंतर खडपोली मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली. पर्याय असलेल्या पेढांबे ते खडपोली मार्गावरदेखील गेले काही दिवस अवजड वाहतूक बंद होती. याबाबत प्रांत कार्यालयत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी रात्रीपासून २० टनी अवजड वाहतूक सुरू करण्यात आली. रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत एमआयडीसीत जाणारी ही अवजड वाहतूक सुरू होती. दरम्यान, औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक समस्या निर्माण झाल्याने ३० टनी गाड्यांची वाहतूक करण्याची मागणी उद्योजकांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी बेले, महावितरणचे पाटणकर, एमआयडीसीचे उपअभियंता हळदणकर, बांधकाम विभागाचे वाजे, प्रधानमंत्री सडक योजनेचे दाभोळकर यांच्यासह सरपंच, सदस्य, उद्योजक प्रतिनिधी व ग्रामस्थांनी रस्त्याची पाहणी केली. या वेळी वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी सांगण्यात आल्या. शुक्रवारपासून १४ चाकी ३० टनी गाड्यांची वाहतूक सुरू करण्याचे ठरवण्यात आले. अवजड वाहतूक सुरू राहणार असल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

चौकट
ग्रामस्थांच्या शंकाचे निरसन
पेढांबे ते खडपोली रस्ता हा ७.७५ मीटरचा आहे. त्यापैकी ५.७५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी साईडपट्टीसह आवश्यक तेथे मोऱ्याही टाकण्यात येणार आहे. अडीच कोटी खर्चाचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच पाठवण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरणाबाबत ग्रामस्थांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. पाहणीदरम्यान विरोध करणारे ग्रामस्थ मात्र पुढे आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com