सिंधुदुर्गात आज विविध सेवाभावी उपक्रम

सिंधुदुर्गात आज विविध सेवाभावी उपक्रम

Published on

92706

सिंधुदुर्गात आज विविध सेवाभावी उपक्रम

प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या वाढदिवसाचे औचित्य; भाजपतर्फे नियोजन, पालकमंत्र्यांकडून आढावा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः जिल्ह्याचे सुपुत्र आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उद्या (ता.२०) वाढदिवस आहे. हा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा होणार आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज जिल्ह्यातील एकूण १४ मंडलात होणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.
संपूर्ण जिल्ह्यात भाजरतर्फे सेवा पंधरवडा हे अभियान सुरू आहे. या अभियानाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली. उद्या श्री. चव्हाण यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्री. चव्हाण यांच्या अपेक्षित सेवेला समर्पित असे उपक्रम भाजपने हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्रात टेली मेडिसिन सुविधा गेली दोन वर्षे सुरू आहे. या सर्व केंद्रांवर उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. भाजप पदाधिकारी विशाल परब यांच्या सौजन्याने फिरता दवाखाना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रुग्णांची चिकित्सा करणार आहे. सावंतवाडीतील भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. वेंगुर्ला भाजप तुळस विभाग आणि युवा मोर्चातर्फे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
होणारे कार्यक्रम असे ः कणकवली शहर - असलदे वृद्धाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू वाटप, कणकवली ग्रामीण - प्राथमिक आरोग्य केंद्र फळवाटप व कलमठ शाळा खाऊ वाटप, देवगड - देवगड समुद्र किनारा स्वच्छता अभियान व क्षयरोगींना जीवनावश्यक वस्तू वाटप, पडेल- विजयदुर्ग किल्ला परिसर स्वच्छता अभियान, वैभववाडी - दत्तमंदिर अभिषेक व उंबर्डे प्राथमिक रुग्णालय फळवाटप, कुडाळ - वाडोस येथे रक्तदान शिबिर, आरोग्य चिकित्सा, नाग्या महादू कातकरी वसतिगृह आणि अपंग पुनर्वसन केंद्र मोरे येथे चादर वाटप, दत्त मंदिर माणगाव येथे १० मोठ्या बैठका, कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महाआरोग्य शिबिर, ओरोस - अणाव वृद्धाश्रम व कातकरी मुले जीवनावश्यक वस्तू वाटप, मालवण शहर - मोफत आरोग्य चिकित्सा, मोफत औषधे कॅम्पचे आयोजन, मालवण ग्रामीण - भरतगड किल्ला स्वच्छता अभियान, सिलिंडर गॅस काळजी घेणेबाबत मार्गदर्शन, सुरक्षा किट, केवायसी अपडेट, सावंतवाडी शहर - सावंतवाडी रुग्णालय फळवाटप, बांदा - इन्सुली २२६ शाळकरी मुले कल्पवृक्ष वाटप, रोनापाल वसतिगृह साहित्य वितरण, आंबोली - माडखोल रक्तदान शिबिर, वेंगुर्ला - सागरी किनारपट्टी स्वच्छता, रेडी आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर, दोडामार्ग - पंतप्रधान सुरक्षा विमा अंतर्गत १००० लोकांचा विमा करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com