तळवडे आंबाडेवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम
तळवडे आंबाडेवाडीत
सांस्कृतिक कार्यक्रम
सावंतवाडी, ता. २० ः तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारपासून (ता. २३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भूतनाथ भजन मंडळ निरवडे, ब्राह्मणदेव भजन मंडळ तळवडे यांची भजने, रात्री १० वाजता थळकर दांडिया ग्रुप (तळवडे), त्रिमूर्ती दांडिया ग्रुप (वेंगुर्ले), तांबळेश्वर भगवती दांडिया ग्रुप (वेंगुर्ले), २४ ला सायंकाळी ७ वाजता गावडेश्वर भजन मंडळ आसोली, पाटेकर भवानी भजन मंडळ तळवडे, श्री देवी सातेरी महिला फुगडी ग्रुप अणसूर, रात्री १० वाजता उत्कर्ष दांडिया ग्रुप वेंगुर्ले, यंगस्टार दांडिया ग्रुप तळवडे, जय गणेश दांडिया ग्रुप मळगाव, २५ ला रात्री ८ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘अयोध्याधिश श्रीराम’, २६ ला रात्री ८ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगावचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘बाळूमामा’, २७ ला रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचे ‘कुर्मदासाची वारी’ नाटक, २८ ला रात्री ८ वाजता श्री लिंगरवळनाथ भजन मंडळ पोखरण कुडाळ (बुवा समीर कदम) विरुद्ध श्री भूतेश्वर भजन मंडळ खुडी देवगड (संतोष जोईल) यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन विकास गावडे यांनी केले आहे.
...................
मालवणात उद्या
आरोग्य चिकित्सा
मालवण ः स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोमवारी (ता. २२) ग्रामीण रुग्णालय मालवण येथे सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी, गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा व रक्त व हिमोग्लोबीन तपासणी, क्षयरोग तपासणी, विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच माता-बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणी केली जाणार आहे. सर्व महिलांनी येताना सोबत रेशनकार्ड, आधारकार्ड व आधारलिंक मोबाईल नंबर घेऊन येणे आवश्यक आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संजय पोळ यांनी केले आहे.
......................
‘योग शिक्षक पदविका’
सावंतवाडी येथे सुरू
सावंतवाडी ः आरपीडी ज्युनियर कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. जे. बी. नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज सावंतवाडी येथे योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम प्रवेश सुरू केला आहे. या शिक्षणक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास आहे. तसेच बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम. कॉम व एम. बी. ए. शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी डॉ. जे. बी. नाईक आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी, आरपीडी प्रयोगशाळेशेजारी, कॉलेज रोड, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
वेंगुर्लेत १ ऑक्टोबरला
आरोग्य चिकित्सा शिबिर
वेंगुर्ले ः येथील उपजिल्हा रुग्णालयात १ ऑक्टोबरला ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत विविधांगी आजारांची तपासणी करणारे मोफत आरोग्य शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत आयोजित केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी दिली. या अभियानादरम्यान मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, नेत्र तपासणी, दंत तपासणी, माता व बाल आरोग्य तपासणी (प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण), महिला व बालकांसाठी पोषण सत्रे, आयुष आणि योग शिबिर, क्षयरोग तपासणी व जागरुकता, रक्तदान शिबिर, अवयवदान प्रतिज्ञा शिबिर, व्यसनमुक्ती जागरुकता सत्रे, किशोरवयीन आरोग्य सत्रे, शालेय आरोग्य तपासणी शिबिर, आयुष्मान, वयवंदना कार्ड, आभा कार्ड शिबिर घेण्यात येत आहेत. तालुक्यातील महिला व बालकांसाठी आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.