सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी दिन
92857
सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी दिन
मालवण : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये हिंदी विभागामार्फत हिंदी दिवस साजरा करण्यात आला. साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. के. के. राबते, प्रा. अन्वेषा कदम आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील मिसबाह काझी, ज्योती जाधव, जागृती पारकर, प्राजक्ता या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस भाषणे केली. प्रा. राबते यांनी भाषा माणसाच्या जीवनशैलीवर किती परिणाम करत असते, याचे विवेचन केले. आयक्यूएसी प्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी विविध हिंदी कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. हंबीरराव चौगले यांनी मार्गदर्शन केले. हिंदी भाषा ही जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ठाकूर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगत बारा कोसांवर भाषा व संस्कृती कशी बदलते, हे समजावून दिले. प्रा. संकेत बेळेकर, प्रा. हसोटीकर, प्रा. रोहिणी फाटक आदींनी शुभेच्छा दिल्या. गीतांजली चव्हाण हिने आभार मानले. याप्रसंगी कृत्तिका हडकर, आदिती आचरेकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.
----------
92856
देवगड किनाऱ्याची भाजपतर्फे स्वच्छता
देवगड ः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड भाजप देवगड मंडलातर्फे येथील समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविले. तसेच १० क्षयरोग बाधित रुग्णांना प्रथिनयुक्त आहाराचे कीट वाटपही केले. यावेळी भाजपचे बाळ खडपे, जिल्हा चिटणीस प्रकाश गोगटे, मंडल अध्यक्ष सदाशिव भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, उपनगराध्यक्ष मिताली सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.