श्रद्धा कळंबटे, अमृता करंदीकर, मीनल ओकना पुरस्कार

श्रद्धा कळंबटे, अमृता करंदीकर, मीनल ओकना पुरस्कार

Published on

-rat२०p१०.jpg-
P२५N९२८१५
श्रद्धा कळंबटे, मीनल ओक, अमृता करंदीकर
------
कळंबटे, करंदीकर, ओक यांना पुरस्कार
स्वामी स्वरूपानंद मंडळ ; पावस मंदिरात उद्यापासून व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला येत्या २२ ते २४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून, या प्रसंगी स्वरूप योगिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळबंटे, पर्यटन व्यावसायिक अमृता करंदीकर व चिपळूणच्या मीनल ओक यांना जाहीर झाला आहे.
योगिनी पुरस्कार जाहीर झालेल्यांमधील श्रद्धा कळंबटे या निवृत्त माध्यमिक शिक्षिका, समुपदेशक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्वयंसेतू या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एड्स जनजागृती, स्त्री भ्रूणहत्येविरोधात प्रबोधन, नेत्रदान, देहदान प्रसार, मुलींच्या जन्माचे स्वागत असे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी झोपडपट्टीतील महिलांचे सर्वप्रथम बचतगट स्थापन केले. सामाजिक समस्यांवर त्यांनी ४०० चर्चासत्रे घेतली आहेत तसेच अमृता करंदीकर या अमृता टुर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने गेली २५ वर्षे देशांतर्गत व देशाबाहेर सहली आयोजित करत आहेत. आतापर्यंत १२०० सहली आयोजित केल्या आहेत. कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा छोटेखानी सहलीसुद्धा त्या आयोजित करतात. त्यांना स्वरूप योगिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चिपळूणच्या मीनल ओक यांनी कोकण पर्यटन विकासातील आव्हाने यावर पीएच.डी केली आहे. गेली २० वर्षे त्या कोकण पर्यटन विकासासाठी काम करणाऱ्या कोकण भूमी प्रतिष्ठानशी संलग्न आहेत तसेच यापूर्वी डीबीजे कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यात्या म्हणून काम केले आहे. यापूर्वी शालेय, महाविद्यालयीन जीवनात जिल्ह्याची उत्तम महिला कबड्डीपटू तसेच अन्य विविध खेळांमध्येही राज्यपातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचा सन्मान स्वरूप योगिनी पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. व्याख्यानमाला व पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्ष जयंत देसाई, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केले आहे.

चौकट
....अशी आहेत व्याख्यानं!
सोमवारी (ता. २२) स्वरूपानंद व्याख्यानमालेत ज्येष्ठ अभ्यासिका अंजली बर्वे या वेणास्वामींचे चरित्र यावर व्याख्यान देणार आहेत. २३ सप्टेंबरला त्या मीराबाईंचे चरित्र उलगडून दाखवणार आहेत. २४ला श्रीकृष्णाचे व्यवस्थापन यावर मीनल ओक व्याख्यान देणार आहेत. २२ रोजी श्रद्धा कळंबटे, २३ला अमृता करंदीकर आणि २४ला मीनल ओक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तिन्ही दिवशी कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५.४५ ते ७.१५ वाजेपर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com