गुहागर किनाऱ्यावर तीन टन कचरा संकलन

गुहागर किनाऱ्यावर तीन टन कचरा संकलन
Published on

-rat२०p१७.jpg-
२५N९२८५९
गुहागर : वेदपाठशाळेतील मुलांनीही घेतला स्वच्छतामोहिमेत सहभाग.
---
गुहागर किनाऱ्यावर तीन टन कचरा संकलन
किनारा स्वच्छ ; नागरिकांच्या सहभागाने मोहीम यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २० : आंतराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छतादिनानिमित्त गुहागर शहरातील ७.५ किमीचा समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीच्या पुढाकाराने हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये शहरातील विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मिळून ८०९हून अधिक जणांचा सहभाग होता. एकूण तीन टन २०० किलो कचरा आज संकलित करण्यात आला.
सकाळी नगरपंचायतीचे कर्मचारी शहरातील नियोजित सात ठिकाणी पोचले होते. तेथे स्वच्छतेसाठी आलेल्या नागरिकांना त्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याचे वितरण केले. त्यानंतर सर्वांनी समुद्रकिनारा, सुरूबन याची स्वच्छता केली. कचरा संकलन करतानाच काच, रबर आणि अन्य प्लास्टिक कचरा अशी वर्गवारी करण्यात आली. सर्व ठिकाणी संकलित झालेला कचरा नगरपंचायतीच्या वाहनांमधून कचरा प्रकल्पापर्यंत नेण्यात आला. एकूण ३ टन २०० किलो कचरा संकलित करण्यात आला.
या अभियानाचे नियोजन करण्यासाठी मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांची १० सप्टेंबरला सभा घेतली होती. सभेत चिपळूणमधील सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ काटदरे आले होते. या सभेत गुहागरच्या ७.५ कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचे भौगोलिक क्षेत्रानुसार सात भाग करण्यात आले. सभेत सहभागी झालेल्या प्रत्येकी २ ते ३ नागरिकांना या भागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. शहरवासियांना नोंदणी करण्यासाठी व आपल्याला कोणत्या भागात स्वच्छता करायला आवडेल तो भाग निवडण्यासाठी नगरपंचायतीने गुगल फॉर्मची निर्मिती केली होती. या सुविधेचा फायदा सुमारे २०० नागरिकांनी घेतला.

चौकट
देवस्थान, संस्थांची मोलाची मदत
शहरातील दुर्गादेवी देवस्थानने सुमारे ५०० हॅण्डग्लोव्हज्, कचरा संकलनासाठी पिशव्या, मास्क तसेच स्वच्छतामोहिम संपल्यावर स्वयंसेवकांना चहा-नाश्ता याची व्यवस्था केली होती. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, दुर्गादेवी देवस्थान, जीवनश्री प्रतिष्ठान, सागरी सीमा मंच, अनुलोम, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर तालुका पत्रकार संघ अशा विविध संस्थांबरोबरच रानवीतील मायनाक भंडारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच खरे-ढेरे महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनीही किनारा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

चौकट
जिल्ह्यातील २३ ठिकाणी स्वच्छता अभियान
दापोली तालुक्यात हर्णै, पाजपंढरी या दोन गावात तीन ठिकाणी तसेच बुरोंडी, उटंबर, आडे असे सहा समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले. गुहागर तालुक्यात धोपावे आणि गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यांवर सात भागात असे एकूण ८ कार्यक्रम झाले. रत्नागिरी तालुक्यात गावखडी, मांडवी, भाट्ये, काळबादेवी, पूर्णगड, मिऱ्या, जाकीमिऱ्या, गणपतीपुळे अशा ८ समुद्रकिनाऱ्यांवर ९ ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com