देवगडमध्ये आजपासून नवरात्रोत्सवाची धूम

देवगडमध्ये आजपासून नवरात्रोत्सवाची धूम

Published on

92904

देवगडमध्ये आजपासून नवरात्रोत्सवाची धूम

‘इंद्रधनू’तर्फे आयोजन; पाऊस रोधक मंडपात होणार रंगणार दांडिया

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः येथील ‘इंद्रधनू’ संस्थेच्या वतीने आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून शहरात सोमवारपासून (ता.२२) ३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दांडियासह सेलिब्रेटी ऑर्केस्ट्रा यांचा समावेश आहे. उत्सवादरम्यान संभाव्य पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी यंदा प्रथमच ‘जर्मन हँगर’ हा पाऊस रोधक मंडप उभारण्यात येणार आहे. उत्सवादरम्यानच्या एका दिवशी पालकमंत्री नीतेश राणे यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती इंद्रधनूच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना देऊन नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पत्रकारांना माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, भाजप तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, इंद्रधनू संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, सहसचिव उदय रुमडे, खजिनदार तुषार पाळेकर, सदस्य मिलिंद मोर्ये, राजीव पडवळ, आनंद रामाणे, वैभव केळकर, दिनेश पटेल, प्रशांत पटेल, भावेश पटेल, यतीन कुळकर्णी, नरेश डामरी आदी उपस्थित होते.
सोमवार (ता.२२) ते १ ऑक्टोबर या कालावधीत रोज रात्री ९.३० वाजल्यापासून दांडिया नृत्यात सहभागी होणाऱ्यांमधून लक्षवेधी चेहरे (स्त्री किंवा पुरुष), दांडिया नाईट ऑफ किंग, दांडिया नाईट ऑफ क्वीन, बेस्ट स्माईल, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट चाईल्ड (मुलगा किंवा मुलगी) अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सोशल मीडिया पसंतीद्वारेही ‘इंद्रधनू इंस्टा किंग’ व ‘इंद्रधनू इंस्टा क्वीन’ यांची निवड करून गौरविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. लहान गटात ५ ते १५ वर्षे वयोगटातील तर मोठ्या गटात १५ वर्षांपुढील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. लहान गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे, ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये रोख तसेच सर्वांना सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ १ हजार रुपये रोख आणि मोठ्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ८ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये रोख व सर्वांना सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ १ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. लहान गटात ३० स्पर्धकांना तर मोठ्या गटात २० स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. नाव नोंदणीसाठी यतीन कुळकर्णी किंवा उदय रुमडे यांच्याशी संपर्क साधावा.
........................
विविध पुरस्कार
या उत्सवात ३ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता ‘सूर नवा ध्यास नवा’ उपविजेती गायिका संज्योती जगदाळे यांचा ‘सेलिब्रेटी नाईट विथ दांडिया’ हा कार्यक्रम होणार आहे. उत्सवातील दहा दिवसांत निवडलेल्या सर्व विजेत्यांना यामध्ये सहभाग देण्यात येणार आहे. यातून संस्थेचा ‘स्टार ऑफ इंद्रधनू दांडिया २०२५’ (स्त्री किंवा पुरुष) हा पुरस्कार देण्यात येईल, तर ‘सेलिब्रेटी चॉईस’ व ‘नवरात्री डान्स आयकॉन २०२५’ (स्त्री किंवा पुरुष) असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com