ओंकार मित्र मंडळातर्फे रिल्स स्पर्धा
ओंकार मित्र मंडळातर्फे रिल्स स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ः पारंपारिक उत्सवांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून, नवरात्रोत्सवाचे वेगळेपण जपण्यासाठी काविळतळी ओंकार मित्र मंडळाने रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलाकारांना मंडळाच्या विविध कार्यक्रमांवर, देवीच्या आगमन सोहळ्यावर आणि नवरात्रीच्या उत्साहावर आधारित रिल्स तयार करायच्या आहेत.
गौरव गांधी, अमित महाडीक व कौशल गांधी यांच्यावतीने रिल्स स्पर्धेचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे, पारंपारिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला आहे. या उपक्रमाला तरुण उद्योजकांचे मोठे पाठबळ मिळाले आहे. नवरात्रौत्सव-रिल्स स्पर्धेत कोणीह सहभागी होऊ शकतो. केवळ व्यावसायिक कलाकारांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही आपली कला सादर करण्याची संधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेचा कालावधी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.