रत्नागिरी- जीएसटी बदलांचा फायदा ग्राहकांना देणार
जीएसटीतील बदलांचा फायदा ग्राहकांना देणार
सुनील सहस्त्रबुद्धे; रुचकरच्या उत्पादनांवर आजपासून सवलत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जीएसटीचे फक्त ५ व १८ टक्के आकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती पाहता भारतात उत्पादित माल येथेच विक्री होण्याकरिता जीएसटीमधील बदल उद्योजकांचा फायदेशीर ठरणार आहे. याचा फायदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग व पुणे येथील ग्राहकांना मिळवून देण्यासाठी फक्त ५ टक्के जीएसटी आकारून उद्यापासून (ता. २२) विक्री करणार असल्याची माहिती रुचकर कोकणचे उद्योजक सुनील हरी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
जीएसटीत झालेल्या बदलांसंबंधी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, दसरा- दिवाळीच्या तोंडावर होणारे हे बदल सकारात्मक आहेत. १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जीएसटीमधील बदलांचे सुतोवाच केले होते. त्यानुसार २८ टक्क्यांवरून १८ टक्के व १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केला आहे. यामध्ये आम्ही उत्पादित करत असलेल्या चकलीचाही समावेश होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुचकरची चकली ५०० दुकानदार, विक्रेत्यांमार्फत वितरित होते. उद्यापासून टॅली व मोबाईल अॅप सिस्टीममध्ये बदल केला जाणार आहे. दरवर्षी १०० टन चकली आणि आंबा वडीचे उत्पादन आणि २५ टन सांडगी मिरची, कुळीथ पीठ, कोकम सरबत वगैरे कोकणी उत्पादने बनवली जातात.
मुंबईतून कोकणात येऊन सहस्त्रबुद्धे यांनी केळ्ये या मूळ गावी येऊन १९९० मध्ये कोकणी पदार्थ निर्मिती सुरू केली. भाऊ, वहिनी व काकू यांच्या सहकार्यामुळे आणि आई सुनीता, वडिल (कै.) हरी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हा उद्योग स्थिरावला. १९९१ साली कारखाना सुरू केला. कुळीथ पीठ, कोकम सरबत, मिरची पावडर, हळद पावडर अशा १०० किलोपासून सुरवात करून आज हा उद्योग १०० टनाच्या पुढे नेला आहे. सध्या त्यांच्याकडे गावातीलच ३० महिला व ३ पुरुष काम करतात. गावातच रोजगार मिळाल्याने ते रात्रंदिवस आणि घेतलेली मोठी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. जीएसटी बदलांमुळे हा उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
ग्राहकाला मिळणार फायदा
सरकारच्या उद्देशानुसार उत्पादनाच्या किंमती कमी केल्यामुळे ग्राहक जास्त खरेदी करेल. त्यातून आमच्यासारख्या लघुउद्योजकांच्या उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच देशाचा जीडीपी वाढण्यासाठी उपयोग होईल. जगातील अस्थिर स्थितीतून वाट काढण्यासाठी सरकारच्या निर्णयाला आम्ही तत्पर साथ देत आहोत. यामुळे ग्राहकाला फायदा मिळणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.