अॅड. देसाई स्मृती भजन स्पर्धा आजपासून
92982
मृदंगांच्या तालावर भजनरत्नांची रंगणार जुगलबंदी
कुडाळात आजपासून स्पर्धा; राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर उद्या (ता. २२) सायंकाळी ७ वाजता श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित (कै.) अॅड. अभय देसाई स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ५० मृदंगांच्या नादब्रह्मामध्ये भव्य असा उद्घाटन सोहळा आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी उद्योजक दत्ता सामंत, नगरसेवक अभी गावडे, लक्ष्मीनारायण पेट्रोलियम कुडाळचे अॅड. विशाल देसाई, ओंकार देसाई, विजय देसाई यांची उपस्थिती असेल. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वाजता श्री सिद्धेश्वर भजन मंडळ, तुळस यांचे भजन होईल. मंगळवारी (ता. २३) रात्री ९ वाजता श्री देवी सातेरी भजन मंडळ, सातुळी, १० वाजता समर्थ राऊळ महाराज भजन मंडळ, पिंगुळी, २४ ला सायंकाळी ७ वाजता सिद्धिविनायक भजन मंडळ, जानवली, रात्री ८ वाजता उमळकर भजन मंडळ कुडाळ, रात्री ९ वाजता गुरुकुल भजन मंडळ, कुडाळ, २५ ला रात्री ८ वाजता स्वरब्रह्म भजन मंडळ, देवगड-जामसंडे, रात्री ९ वाजता श्री देव भोम भजन मंडळ, आंदुर्ले, २६ ला रात्री ८ वाजता माऊली भजन मंडळ, कोलझर, रात्री ९ वाजता श्री देव विश्वकर्मा भजन मंडळ, वाडीवरवडे, २७ ला सायंकाळी ७ वाजता कुलस्वामी भजन मंडळ, पावशी, रात्री ८ वाजता दत्तकृपा भजन मंडळ, वैभववाडी, ९ वाजता जनसेवा भजन मंडळ, वेंगुर्ले, १० वाजता श्री देवी माऊली भजन मंडळ, सातोसे, २८ ला सायंकाळी ७ वाजता श्री देव भूतनाथ भजन मंडळ, कोचरा, रात्री ८ वाजता दत्तगुरू भजन मंडळ, वैभववाडी, ९ वाजता श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ, वालावल, १० वाजता श्री विश्वकर्मा भजन मंडळ, राठीवडे, २९ ला सायंकाळी ७ वाजता ब्राह्मणदेव भजन मंडळ, पडवे, रात्री ८ वाजता सद्गुरू भजन मंडळ, कुसबे, ९ वाजता गांगेश्वर कृपा भजन मंडळ, श्रावण, १० वाजता स्वरधारा भजन मंडळ, तांबोळी, ३० ला रात्री ८ वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त, ९ वाजता श्री देव रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी, १० वाजता महापुरुष भजन मंडळ, पिंगुळी, १ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता कुलस्वामिनी भजन मंडळ, हिर्लोक, रात्री ८ वाजता सद्गुरू भजन मंडळ, अणसूरपाल, ९ वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ, पाट पंचक्रोशी, १० वाजता विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंदुर्ले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.