एसटीच्या चाकाखाली सापडून वासराचा मृत्यू
लोगो ः मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर
-------
92979
एसटी बसखाली सापडून वासराचा मृत्यू
मालवणातील घटना; जखमी गुरांसाठी खोत सरसावल्या
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ ः शहरातील पोस्ट ऑफिससमोरील रस्त्यावर एसटीच्या चाकाखाली सापडल्याने एका वासराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली असून चालकाचे दुर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मृत वासराची विल्हेवाट लावली. मात्र, वासराचा मालक पुढे आला नाही. वासराच्या मृत्यूनंतर त्याची आई असलेली गाय आपल्या पाडीच्या शोधात भटकताना दिसून आली. या हृदयद्रावक दृश्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरात या आधीही अशीच अनेक अपघाती प्रकरणे घडली आहेत. सागरी महामार्गावर एका बैलाच्या पायावरून वाहन गेल्याने तो अपंग झाला होता, तर बसस्थानक परिसरातही एका वासराचा अपघाती मृत्यू झाला होता. काही दिवसांतच पुन्हा अशी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पालिकेने दोन वेळा मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. पकडलेल्या जनावरांचे मालक दंड भरल्यानंतर ती परत करण्यात आली. कायमस्वरूपी जनावरे पकडण्यासाठी एजन्सी नेमली असून तात्पुरता कोंडवाडाही उभारला आहे. तरीही वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा मोठी मोहीम राबवावी लागणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, शहरात जखमी किंवा मालकविरहित जनावरांच्या संरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वखर्चातून जखमी बैल, गाय आणि वासरू यांना खांबळे येथील गोशाळेत दाखल करून त्यांना चारा व खाद्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच बजरंग दलाचे पदाधिकारीही गायींच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.