चिपळूण -निळे भुंगेरे या किडीचा भात पिकावर प्रादुर्भाव

चिपळूण -निळे भुंगेरे या किडीचा भात पिकावर प्रादुर्भाव

Published on

rat20p6.jpg-
93010
चिपळूण ः तालुक्यातील भातपिकांवर निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

निळे भुंगेरे या किडीचा भातपिकावर प्रादुर्भाव
शेतकरी चिंतेत; पाणी साचणाऱ्या ठिकाणी सर्वाधिक आढळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ः तालुक्यातील काही ओढे व नदी-नाल्यांच्या काठावरील तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या भातशेतीत निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी केले आहे.
वातावरणातील बदलांबाबत माहिती देताना म्हेत्रे म्हणाले, ही कीड गर्दनिळ्या रंगाची असून, तिची अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. अळी अवस्था व प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. परिणामी, पानांवर पांढरे डाग दिसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास भातपिकाची वाढ खुंटते. या किडीचा प्रसार विशेषतः पाणथळ जमिनीत तसेच नत्रखताचा अवाजवी वापर झाल्यास अधिक प्रमाणात होतो. भातकापणीनंतर ही कीड बांधावरील गवतावर व भाताच्या फुटव्यांवर उपजीविका करते आणि पुढील हंगामात भातपिकास उपद्रव देते.
ही कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी भातलावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत. सतत प्रादुर्भाव असलेल्या पाणथळ भागात कापणीनंतर शेताची नांगरट करून धस्कटे काढून टाकावीत. जमिनीत पाणी जास्त काळ साचणार नाही यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. रासायनिक नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात क्विनॉलफॉस २५ टक्के, २००० मिलीमीटर किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के, २५० मिली यापैकी एक कीटकनाशक मिसळून फवारणी करावी, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

कोट
शेतकरी बांधवांनी कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून किडीचा प्रसार आटोक्यात आणावा. तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
- शत्रुघ्न म्हेत्रे, कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com