सापडलेले पैशाचे पाकीट केले परत
93029
सापडलेले पैशाचे पाकीट केले परत
मालवण : येथील व्यापारी संघाचे सदस्य बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट त्यांनी ओळख पटवून मालकाला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तळवडेकर यांना रस्त्यात एक पैशाचे पाकीट सापडले. त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यात रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक एटीएम आणि क्रेडिट कार्ड असे महत्त्वाचे कागदपत्र होते. तळवडेकर यांनी पाकिटातील आधार कार्डच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर मुंबईहून मालवण परिसरात स्थायिक झालेले सेवानिवृत्त कर्मचारी सुनील कुमार यांचे ते पाकीट असल्याचे निदर्शनास आले. तळवडेकर यांनी तत्काळ मालवण येथील ज्येष्ठ व्यापारी नानाशेठ पारकर, हेमंत शिरपुटे, जयू शिरपुटे, हर्षल बांदेकर, उमेश मयेकर आणि मयू पारकर यांच्या उपस्थितीत खात्री करून सुनील कुमार यांना त्यांचे हरवलेले पाकीट सुपूर्द केले. हरवलेले पाकीट आणि सर्व वस्तू सुरक्षित मिळाल्याने सुनीलकुमार यांनी तळवडेकर यांचे आभार मानले.
------
93028
डॉजबॉल स्पर्धेत ‘मदर क्विन्स’ विजेता
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुले व मुली या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान बळकट केले. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर, क्रीडाशिक्षक भूषण परब आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.