कुडाळात गुरुवारी रांगोळी स्पर्धा
कुडाळात गुरुवारी
रांगोळी स्पर्धा
कुडाळ ः भाजपच्या (सिंधुदुर्ग) वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त गुरुवारी (ता. २५) कुडाळ हायस्कूल येथील आरती प्रभू कला अकादमी येथे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत मिळविलेले यश, ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मिळविलेले यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्व जीवनावर व आधारित रांगोळी, असे आहेत.
गोसावी समाज मंडळाची
रविवारी पावशीत सभा
कणकवली ः नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) सकाळी १० वाजता पावशी येथील वाटवे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा होणार असून, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षांनी केले आहे.
वैभववाडीत शनिवारी
तालुका सहकार मेळावा
वैभववाडी ः वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने तालुकास्तरीय सहकार मेळावा शनिवारी (ता. २७) आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपनिबंधक बाळ परब उपस्थित राहणार आहेत. खरेदी-विक्री संघाच्या वतीने चेअरमन प्रमोद रावराणे व सर्व संचालकांनी चांगले नियोजन केले आहे. या मेळाव्याला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा संघाचे अध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा बँक संचालक दिलीप राणे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप, प्रभाकर सावंत, तुळशीदास रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रमोद रावराणे व सर्व संचालकांनी प्रत्येक गावातील सोसायटी व ग्रामपंचायतीला भेट देऊन आमंत्रण दिले आहे. यावेळी सहा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सभेचे आयोजन केले असून, सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमोद रावराणे व सिद्धेश रावराणे यांनी केले आहे.
कणकवली-कनेडी-फोंडा
एसटी सेवा पूर्ववत
कणकवली ः भिरवंडे-गांधीनगर (खलांतर) कणकवली- कनेडी- हरकुळ खुर्दमार्गे फोंडा एसटी बस पूर्ववत सुरू केल्याने विद्यार्थी व प्रवासी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. भिरवंडे-हनुमंतवाडी, ते खलांतर रस्ता व पुलाचे काम सुरू असल्याने ही एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्त्याचे काम मार्चमध्ये, तर पुलाचे काम जूनमध्ये पूर्ण झाले होते. ही एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी भिरवंडे व गांधीनगरच्या ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण झाले असून, वरील मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटी बस सुरू करण्यात आली आहे. पूर्वीच्याच वेळेप्रमाणे एकूण चार फेऱ्या भिरवंडे खलांतरमार्गे जाणार आहेत.
रेडीत आजपासून
विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः श्री देव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी म्हारतळेवाडीच्या वतीने उद्यापासून (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या रात्री ९ वाजता रेडी सरपंच रामसिंग राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप नेते विशाल परब, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. विविध स्पर्धा, पाककला, पैठणी, फुंगडीची जुगलबंदी, डबलबारी, दांडिया, गरबा, दशावतारी नाटक, गेम शो असे कार्यक्रम मंडळाकडून आयोजित केले आहेत. अधिक माहितीसाठी नंदकुमार मांजरेकर व नीलेश पांडजी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.