फणसूत आजपासून नवरात्रोत्सव
फणसूत आजपासून नवरात्रोत्सव
गावतळे ः दापोली तालुक्यातील फणसू येथील संकल्प सेवा मंडळातर्फे सोमवारपासून (ता. २२) नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ला घटस्थापना, रात्री १० वा. भजन, २३ ला रात्री १० वा. भजन, २५ ला रात्री १० वाजता भजन, २७ ला रात्री १० वाजता सुश्राव्य कीर्तन, ३० ला दुपारी ३ ते ५ या वेळेत हळदीकुंकू, ३ ऑक्टोबरला दुपारी ३ नंतर श्री. दुर्गादेवी मातेची ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या दरम्यानच्या कालावधीत दररोज दुपारी १२ वाजता आरती व रात्री दांडिया (गरबारास) असे कार्यक्रम होणार आहेत.
92936
पूर्णगड किनाऱ्याची स्वच्छता
पावस ः आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त पूर्णगड समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता सागरी सीमा मंचातर्फे करण्यात आली. या उपक्रमात पूर्णगड ग्रामस्थ, पालक, पूर्णगड मराठी नं. १, पूर्णगड खारवीवाडा शाळा, पूर्णगड उर्दू शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. पावसकर, गावचे प्रतिष्ठित नागरिक वासुदेव वाघे, दादा वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
92937
कबड्डी संघात वेद पाटीलची निवड
पावस ः मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग व गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कोकण विभागाचा ( रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा) कबड्डीचा मुलांचा संघ निवड चाचणीतून निवडण्यात आला. या संघामध्ये शिवारआंबेरे येथील पेजे महाविद्यालयाचा वेद प्रमोद पाटील याची कोकण विभागाच्या कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वेद पाटील हा आपल्या कोकण विभागाचे नेतृत्व करणार आहे. त्याला क्रीडाशिक्षक राकेश आंबेकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थुळ आदांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.