रायफल शूटिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’; अनंतचे जल्लोषामध्ये स्वागत
93055
रायफल शूटिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’;
अनंतचे जल्लोषामध्ये स्वागत
सावंतवाडी, ता. २२ ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सार्जंट अनंत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशाबद्दल सावंतवाडीमध्ये त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
५८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) चा अनंत हा नववीचा विद्यार्थी आहे. दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले. लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते त्याला हा बहुमान प्रदान करण्यात आला. त्याच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाने त्याचे स्वागत केले. गवळी तिठा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक आमदार दीपक केसरकर कार्यालय, श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक आणि बाजारपेठमार्गे शाळेपर्यंत पोहोचली. या मिरवणुकीत विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेच्या सभागृहात अनंतचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, एनसीसीचे श्री. गवस, श्री. बागुल, वैभव केंकरे आदी उपस्थित होते.
....................
93056
मुणगे आडवळवाडी किनाऱ्याची स्वच्छता
मुणगे, ता. २२ ः येथील आडवळवाडी समुद्र किनाऱ्याची ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सरपंच अंजली सावंत, उपसरपंच दशरथ मुणगेकर, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गुरव, प्रमोद सावंत, रविना मालडकर, प्राथमिक शाळा शिक्षक भगवती हायस्कूलचे विद्यार्थी, देवी भगवती देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, सचिव निषाद परुळेकर, सदस्य पुरुषोत्तम तेली, अनिल धुवाळी, सामाजिक कार्यकर्ते गोविंद सावंत, कोतवाल संजय रुपे, पोलिसपाटील साक्षी सावंत, ग्रामस्थ सुनील सावंत, शिवदास रासम, उमेश पाडावे, सत्यवान बागवे, विजय पडवळ, विश्वनाथ बोरकर, संदीप आचरेकर आदींची उपस्थिती होती. सरपंच अंजली सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.