नवरात्रोत्सवाच्या मंगल नादात उजळणार श्री देवी शांतादुर्गा मंदिर
93096
नवरात्रोत्सवाच्या मंगल नादात उजळणार श्री देवी शांतादुर्गा मंदिर
म्हापणमधील सोहळा; ४ ऑक्टोबरपर्यंत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २१ ः पंचक्रोशीतील श्री देवी शांतादुर्गा (सातेरी) मंदिर येथे उद्या (ता.२२) पासून ते ४ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. संपूर्ण सिंधुदुर्गात नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सव काळात दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आयोजित कार्यक्रम असे ः उद्या (ता.२२) सकाळी १० वाजता घटस्थापना, सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. वासुदेव राधाकृष्ण बुरसे (पुणे) यांचे भागवत पुराण प्रवचन, ७ वाजता दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ (मळई बुवा, गुरूमार्गी), ९ वाजता दर्यावर्दी वारकरी भजन मंडळ (खवणे बुवा दाजी जुवाटकर). २३ ला ४ वाजता - बुरसे बुवा यांचे भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - अशोक पाटकर पुरस्कृत भजन, ९ वाजता - जय हनुमान भजन मंडळ (मळई बुवा सिद्धेश मार्गी). २४ ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - ब्राह्मण देव भजन मंडळ (पागेरे बुवा संजोग परब), ९ वाजता - जय संतोषी माता नाट्यमंडळ, मातोंड - पेंडुर यांचे दशावतार नाटक. २५ ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ९ वाजता - म्हापण तेलीवाडी भजन मंडळ (रमाकांत रावले). २६ ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - नीलेश मुंडिये पुरस्कृत भजन, ९ वाजता - सातेरी महिला भजन मंडळ, म्हापण, १० वाजता - आमोल वाईकर यांचे गायन. २७ ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - सिद्धमहापुरुष प्रासादिक भजन मंडळ, गोसावीवाडी, ९ वाजता - सुनिल गोसावी मित्रमंडळ, पाट यांचे गायन. २८ ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - रामकृष्ण हरी भजन सेवा संघ, पाट (आशिष सडेकर), ९ वाजता - कुलदेवता भजन मंडळ, खवणे घाडीवाडी. २९ ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - स्थळकार भजन मंडळ, खवणे (मनोज घाडी), ९ वाजता - स्वामी समर्थ भजन मंडळ, जुनव्हाळ-खवणे (बाळा परब). ३० ला ४ वाजता - भागवत प्रवचन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ वाजता - नाथा मडवळ पुरस्कृत भजन, ९ वाजता - खवणे भगतवाडी भजन मंडळ (सुंदर भगत). १ ऑक्टोबरला ४ वाजता - भागवत प्रवचन. ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ, ८ ते १० वाजता - ज्योतीराज केळुसकर बुवा यांचे गायन (राजेश म्हापणकर पुरस्कृत). २ ऑक्टोबर - विजयादशमी ४ वाजता - बुरसे बुवा यांचे कीर्तन, ७ वाजता - दुर्गा सप्तशती पाठ समाप्ती, घट उतरविणे व सोने लुटणे, ९ वाजता - ओंकार पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा विशेष प्रयोग. ३ ऑक्टोबर - ९ वाजता - देवी शांतादुर्गा व सिद्धेश्वर उत्सवमूर्ती सजवून विराजमान, ११ वाजता - भजन (अजित ठाकूर पुरस्कृत - संदेश सामंत व दि.वा. पाटकर), पहाटे ४ वाजता - काकड आरती (खोत भजन मंडळ - दीपक खोत). ४ ऑक्टोबर सकाळी - ओटी भरणे, सायंकाळी ६:३० वाजता - उत्सव सांगता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.