तळवडे क्रमांक ९ शाळेत भाजपमार्फत वह्या वाटप
swt223.jpg
93206
तळवडेः शाळेत भाजपतर्फे वह्या वाटप करण्यात आले.
तळवडे क्रमांक ९ शाळेत
भाजपमार्फत वह्या वाटप
आरोंदाः भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. माजी आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे यांच्या सहकार्याने व माजी सैनिक प्रवीण लोके, सुधीर लोके यांच्या पुढाकाराने तळवडे जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना तळवडेचे माजी उपसरपंच बाळू साळगावकर यांनी शासनामार्फत राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तळवडे शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तसेच शासनाने राबविलेल्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिक्षकांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. यावेळी माजी गाव अध्यक्ष भाजपचे रामभाऊ गावडे, बुथ अध्यक्ष सुशांत गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश मेस्त्री, मुख्याध्यापिका अनुराधा सावंत, शिक्षक दिगंबर तळणकर, नागेश कोरगावकर, पंकज लोके, संजय आचरेकर, प्रसाद गावडे, रामदास मेस्त्री, शंकर लोके, शाम हरमलकर उपस्थित होते.
...........................
swt224.jpg
93207
शिरोडा ः येथील आरोग्य शिबिराचा महिला, ग्रामस्थांनी लाभ घेतला.
शिरोड्यामध्ये ३८३ जणांची चिकित्सा
आरोंदाः ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. २०) आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ३८३ रुग्णांची चिकित्सा करण्यात आली. यात महिला व बालकांची (१४ वर्षेपर्यंत) आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच चंदन आवटी, माजी आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, बाबा नाईक, पांडुरंग नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण देसाई, डॉ.आकाश काठोले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.