अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे वसतिगृह लवकरच सुरु करू
rat२२p५.jpg-
२५N९३१८८
सावर्डे ः रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल कार्यकारिणी बैठकीत आमदार शेखर निकम यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन सोबत कार्यकारिणी सदस्य.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे वसतिगृह
सुरू करू ः शेखर निकम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २३ : अल्पसंख्याक समाजातील विकासकामे करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. रत्नागिरी येथील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह लवकर सुरू व्हावे यासाठी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी करू, असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिली.
सावर्डे येथे झालेल्या रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल कार्यकारिणीत ते बोलत होते. कार्यकारिणी बैठकीला अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष इमाम शहा, अकबर दसुरकर, डॉ. शामिना परकार, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, संगमेश्वर तालुका अल्पसंख्याक महिला अध्यक्षा सबिहा नेवरेकर, नईम हुनेरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी अल्पसंख्याक सेलच्यावतीने केलेल्या कार्याचा व उपक्रमाचा आढावा घेतला. अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून प्रदेशस्तरावरून देण्यात येणारे कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगताना अल्पसंख्याक दिन, स्वराज्य सप्ताह आदी साजरा करण्यात आल्याचे सांगितले.