कुडाळात ‘ड्रीम स्क्वेअर’तर्फे दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना
93221
कुडाळात ‘ड्रीम स्क्वेअर’तर्फे
दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना
कुडाळ, ता. २२ ः वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीतर्फे आजपासून नवरात्रोत्सव सोहळ्याला श्री दुर्गामातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेने सुरुवात झाली. यानिमित्त २ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांगिर्डे-कुडाळ येथे केले आहे. उद्योजक संतोष वालावलकर यांनी ही माहिती दिली.
उद्या (ता. २३) रात्री ९ वाजता गरबा रास, २४ ला सायंकाळी ७ वाजता १० वर्षांखालील मुलांचे रेकॉर्ड डान्स, फॅन्सी ड्रेस, रात्री ९ वाजता गरबा रास, २५ ला सायंकाळी ७ वाजता भजन, श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ पागेरेवाडी-खवणे यांचे भजन, रात्री ९ वाजता गरबा रास, २६ ला सायंकाळी ७ वाजता लहान मुलांचे मनोरंजनात्मक खेळ, कपल गेम्स (निवेदक-युसुफ आवटी), रात्री ९ वाजता गरबा रास, २७ ला रात्री ९ वाजता ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’, गरबा रास, २८ ला रात्री ९ वाजता मोठ्या मुलांचे रेकॉर्ड डान्स, गरबा रास, २९ ला रात्री ९ वाजता गरबा रास, ३० ला कन्यापूजन, ओटी भरणे कार्यक्रमस, रात्री ९ वाजता गरबा रास, १ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता गरबा रास, २ ला रात्री ९ वाजता गरबा रास होईल.