‘तोरगलकर’चे कॅरम स्पर्धेत यश
‘तोरगलकर’चे
कॅरम स्पर्धेत यश
रत्नागिरी : जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेत महर्ष आडिवरेकर व दीपराज कदम (१२वी विज्ञान) यांनी उत्तम खेळाची कामगिरी केल्यामुळे त्यांची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक म्हणून अमर नेवरेकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक के. डी. कांबळे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, विभागप्रमुख पंडित, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
----------
चित्रकला परीक्षेत
अवंतिका प्रथक
पाली ः पाली प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये चित्रकला परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागद व वॉटरकलर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. हा उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला. चित्रकला परीक्षा तीन गटात घेण्यात आली. त्यात ६वी, ७वी गटात अवंतिका यलप्पा हट्टीहोलीने प्रथक क्रमांक पटकावला. तिसरी व चौथीच्या गटात अनुष्का गावडे आणि १ली, २री व ३रीच्या गटात अरूण निषाद याने प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या वेळी स्नेहा शिंदे, पाली शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, मारूती घोरपडे, श्रद्धा रसाळ, श्रुती वारंग, प्रमिला मावळणकर उपस्थित होते.
-----
कोतवडेत ३० ला नेवरे,
कोतवडेत फेरफार अदालत
रत्नागिरी : महाराजस्व अभियान सेवा पंधरवडाअंतर्गत दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर भूमापन कार्यालयामार्फत रत्नागिरी तालुक्यातील नेवरे व कोतवडे येथे ३० सप्टेंबरला जिवंत मिळकत पत्रिका व फेरफार अदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन कार्यालयाने केले आहे. मिळकत पत्रिकेवरील मयतधारकांचे वारसनोंदीबाबतची संपूर्ण प्रक्रिया उपक्रमात पार पाडली जाणार आहे. मिळकत पत्रिकेवरील नावे अद्ययावत केली जाणार आहेत.
---------
नाणीज महाविद्यालयात
लोकराज्य महाअभियान
साखरपाः नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिरमध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान झाले. अनुलोम संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई, अनुलोम संस्थेचे भाग-जनसेवक ओंकार पिंपुटकर, निखिल आपटे आदी उपस्थित होते. अनुलोम संस्थेचे भाग-जनसेवक ओंकार पिंपुटकर यांनी संस्थेची माहिती दिली. आपटे यांनी भारतीय स्वातंत्र्य, संविधान समिती, संविधान निर्मिती प्रक्रिया, लोकशाहीचे महत्व, संविधानात समाविष्ट बाबी, संविधानातील कलमे आणि परिशिष्ट आदींची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.