अनुसयामाता आश्रमात नवरात्रोत्सवाची धूम
अनुसयामाता आश्रमात
नवरात्रोत्सवाची धूम
कणकवली ः विश्रांतीधाम कणकवली श्री देव स्वयंभू मंदिरनजीकच्या प.पू. देवी अनुसयामाता आश्रम येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये २६ ला ललितापंचमीनिमित्त सकाळी ९ वाजता श्री देवी अंबामातेवर अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता सुश्राव्य भजने, २ ऑक्टोबरला विजयादशमी निमित्त सकाळी १० वाजता श्री रामप्रभूंवर व श्री देवी अंबामातेवर अभिषेक, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता सुश्राव्य भजन, ३ ला सायंकाळी ५ वाजता श्री देवी अंबामातेची विसर्जन मिरवणूक होणार आहे. उत्सव कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत श्री राम रामेश्वरी या ग्रंथाचे पारायण शुभरत्ना राणे करणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमाने केले आहे.
.....................
सातार्डा मेसवाडीत
सांस्कृतिक कार्यक्रम
सावंतवाडी ः नवरात्रोत्सवानिमित्त सातार्डा-मेसवाडी येथील दोस्ती मंडळातर्फे २२ ते ३० सप्टेंबर कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता गरबा-दांडिया नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा होणार आहे. उद्या (ता. २३) रांगोळी स्पर्धा, २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत खुली गरबा-दांडिया नृत्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या दांडिया ग्रुपला १५ हजार, उपविजेत्या ग्रुपला १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छुक दांडिया ग्रुपनी मंडळाचे कार्यकर्ते वृषभ गोवेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
------
धारवाडला आज
पुस्तक प्रकाशन
सावंतवाडी ः मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधले दिवस’ या पुस्तकाच्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन उद्या (ता. २३) धारवाड येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विमोचन संघटना, कर्नाटकचे अध्यक्ष बी. एल. पाटील, अनुवादक आणि ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. संजीव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. धारवाड येथील स्वयंदीप झेन केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या अनुवादाचा प्रकाशन सोहळा सायंकाळी ६ वाजता कर्नाटक हितवर्धक संघाच्या धारवाड येथील आर. एच. देशपांडे सभागृहात होणार आहे.
........................
माणगावात ऑक्टोबरला
‘विवाहपूर्व मार्गदर्शन’
सावंतवाडी ः माणगाव (ता. कुडाळ) येथील वैश्य समाज पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या जागेत १२ ऑक्टोबरला विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत ‘विवाहपूर्व मार्गदर्शन’ करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन सर्व समाजातील तरुण-तरुणींसाठी असेल. ज्यांना या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी आयोजक सेलेस्तीन शिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा. इतर सुविधा मिळण्याच्या दृष्टीने १० ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.