आंबडवे आरोग्य केंद्राला देणार वैद्यकीय साहित्य

आंबडवे आरोग्य केंद्राला देणार वैद्यकीय साहित्य

Published on

आंबडवे आरोग्य केंद्राला देणार वैद्यकीय साहित्य
तरुणांचा पुढाकार ; सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण
मंडणगड, ता. २२ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगाव आंबडवे येथील सरकारी दवाखान्यात वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, सामान्य जनतेला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पंचक्रोशीतील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. अत्यावश्यक मशिनरी, वस्तुंचे लोकार्पण २७ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता होईल.
मायभूमी फाऊंडेशनचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळींनी दवाखान्याला भेट देऊन डॉ. आसिफ खान यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार दवाखान्यासाठी तातडीने ईसीजी मशीन, मॉनिटर, एचबी मॉनिटर, बेड, व्हीलचेअर, नेब्युलायझर, स्टेचर, वॉटर कूलर आदी उपकरणांची गरज असल्याचे निश्चित झाले. त्यासाठी विजय घरटकर यांनी विशेष पुढाकार घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी तत्परता दाखवली. विविध लोकांनी केलेल्या आर्थिक साह्यामुळे आरोग्य केंद्राला आवश्यक साहित्य भेट दिले जाणार आहे. या उपक्रमात पंचक्रोशीतील आंबवणे बुद्रुक गावचे विजय घरटकर, कॅप्टन शरद धामणे, डॉ. सुशांत बांद्रे, इंजि. रुपेश बांद्रे, भावेश धामणे, दीपक धामणे, नितेश धामणे, अमोल घरटकर, मनोहर घरटकर, आसवले येथील चंद्रकांत बोर्ले आदींनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम, तहसीलदार अक्षय ढाकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com