देवगड तालुक्यात दांडियाची धूम
93340
देवगडमध्ये ठिकठिकाणी दांडियाचा फेर
नवरात्रोत्सवास प्रारंभ; तरुणाईमध्ये आनंदी आनंद
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः तालुक्यात ठिकठिकाणी आज रात्रीपासून दांडिया नृत्याचा फेर रंगणार आहे. यासाठी विविध मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. तरुणाईमध्ये उत्साह संचारला आहे. काही भागांत दुर्गामूर्तीचे आगमन होऊन पारंपरिक पद्धतीने पूजन झाले असून, दिवसभर उत्साही वातावरण होते. दरम्यान, येथील ‘इंद्रधनू’ या संस्थेतर्फे पावसापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी मंडप उभारला असून, दांडिया खेळणाऱ्यांसाठी सोयीचे झाले आहे.
गणेशोत्सवानंतर तरुणाईला नवरात्रोत्सवाचे वेध असतात. तालुक्यातील विविध देवींच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देवींच्या मूर्ती भरजरी वस्त्रे आणि अलंकार घालून सजविल्या आहेत. फुलांची सजावट केली आहे. आज रात्रीपासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. तसेच दांडिया खेळण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. ठिकठिकाणच्या मंडळींनी आपापल्या ठिकाणी गरबा नृत्यासाठीची तयारी केली आहे. परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही भागांत मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्यावर भर असतो. येथील शहरातही दांडियाची तयारी झाली आहे. येथील ‘इंद्रधनू’ या संस्थेतर्फे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून शहरात आजपासून ३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दांडियासह सेलिब्रेटी ऑर्केस्ट्रा यांचा समावेश आहे. संभाव्य पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी ‘जर्मन हँगर’ हा पाऊस रोधक मंडप उभारला आहे. यामुळे गरबा खेळताना पावसाचा व्यत्यय येणार नाही. किनारी भागात पावसाचे सावट आहे. रविवारी रात्री हलक्या सरी बरसल्या. आजपासून पुढील दहा दिवस उत्साह असणार आहे. यंदा नऊ नाही, तर दहा दिवस नवरात्रोत्सव आहे. अकराव्या दिवशी दसरा सण आला आहे. त्यामुळे उत्साहात आणखी भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.