कुडाळात होणाऱ्या आंदोलनात
''कुंभार'' बांधवांनी सहभागी व्हावे

कुडाळात होणाऱ्या आंदोलनात ''कुंभार'' बांधवांनी सहभागी व्हावे

Published on

‘कुंभार बांधवांनी
आंदोलनामध्ये
सहभागी व्हावे’
मालवण, ता. २२ : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघातर्फे २३ व २४ ला कुडाळ येथील जिजामाता चौक येथे आंदोलन छेडण्यात येत आहे. यात कुंभार समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी केले आहे. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे. केवळ ओबीसीच नव्हे तर इतर आरक्षित समाजातील लोकही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यात ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी असे एकूण ५२ टक्के पेक्षा जास्त आरक्षित समाज आहे. या सर्व समाजांनी राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याची जाणीव राज्य सरकारला करून देण्यासाठी जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने हे आंदोलन जाहीर केले आहे. यात जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांनी सहभागी होऊन आपल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. सांगवेकर यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com