कोकणी मुस्लिमांच्या स्वयंपाकघरातील भांडी ‘लोटिस्मा’त
-rat२२p१२.jpg-
२५N९३१८७
चिपळूण : येथील ‘लोटिस्मा’च्या वस्तुसंग्रहालयात कोकणी स्वयंपाकघरातील भांडी उपलब्ध झाली आहेत.
-----
कोकणी स्वयंपाकघरातील भांडी ‘लोटिस्मा’त
मुश्ताक, सईद देसाई बंधूंचा पुढाकार ; सुमारे लाखांचे मूल्य, अभ्यासकांना पाहण्याची संधी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाला कोकणी स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी भांडी भेट मिळाली आहेत. ती सुमारे एक लाख रुपयांची आहेत.
लोटिस्मामध्ये दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मिळ पुरातन वस्तूंचा खजिना आहेत. इथल्या काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे म्हणजेच आदम पुराश्मयुग, मध्यपुराश्मयुग, उत्तरपुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधुसंस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण युगात मागे घेऊन जातात. आता या वाचनालयाला मुश्ताक आणि सईद देसाई बंधूंनी मुस्लिम समाजाच्या स्वयंपाकघरातील भांडी भेट दिली आहेत. या वस्तू मिळण्यासाठी वाचनालयाला रमण डांगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मुस्लिम समाजात भांड्यांना आतून आणि बाहेरून कल्हई केली जाते. अशी अनेक भांडी आता अभ्यासकांना पाहायला मिळतील. सुमारे एक लाखांची ही भांडी भेट देऊन देसाईबंधूंनी संग्रहालयात महत्त्वाची भर घातली आहे. ‘लोटिस्मा’च्यावतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी देसाई बंधूंना उपरणे व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या वेळी संस्थेचे संचालक प्रकाश घायाळकर, संजय शिंदे उपस्थित होते.
चौकट
‘लोटिस्मा’ने हा ठेवा जपलाय
लोटिस्मामध्ये पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदी शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षपूर्व गणपती, कलात्मक कंदील, दुसऱ्या महायुद्धात वापरलेले भूमापन दुर्बिण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शवणारे जुने लाकडी टेबलावरील, भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटियन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनवलेली पेटी, दक्षिण ध्रुवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्नओव्हर (फोंडा-कणकवली), क्वार्ट्ज (वाटूळ-लांजा), बॉक्साईट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदी खनिजे, होकायंत्राची दिशा बदलवणारे दगड, जुना सारीपाटाचा खेळ वेगवेगळ्या आकर्षक रचनेत मांडण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.