उद्यमनगर रस्त्यावर खड्डे, नागरिक त्रस्त

उद्यमनगर रस्त्यावर खड्डे, नागरिक त्रस्त

Published on

- rat23p3.jpg, rat23p4.jpg-
P25N93451, 25N93452
रत्नागिरी ः उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे.
---
उद्यमनगर रस्त्यावर खड्डे, नागरिक त्रस्त
वाहने चालवणे गैरसोयीचे ; वाहनचालकांची कसरत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः शहरालगत असलेल्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. मुसळधार पावसात पाणी साचल्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. वाहनचालकांना विशेषकरून महिला वाहनचालकांना येथून वाहने चालवणे गैरसोयीचे होत आहे. हा रस्ता रत्नागिरी नगरपालिकेकडे आहे की, शिरगाव ग्रामपंचायतीकडे याबाबत निर्णय होत नसल्याने खड्डे बुजवण्याची मागणी करायची कुणाकडे, असा संभ्रम येथील नागरिकांना पडला आहे.
पावसाळ्यापूर्वी उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती; मात्र पावसाळा जाण्याच्या मार्गावर असूनही याकडे रत्नागिरी नगरपालिका किंवा शिरगाव ग्रामपंचायतीकडून लक्ष दिले गेलेले नाही; मात्र हा रस्ता कोणाच्या हद्दीत येतो यावरून संभ्रम आहे. हा रस्ता रत्नागिरी शहरातून शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पुढे जातो. त्यामुळे याची दुरुस्ती कुणी करायची, हा प्रश्नच आहे. काही स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत शिरगाव ग्रामपंचायतीकडे मागणीही केलेली होती. पायाभूत सुविधा देण्यात प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागातील लोकप्रतिनिधीही रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देत नसल्याने लोकांचा पारा चढलेला आहे.

चौकट
नागरिकांना त्रास
दोन प्रशासनात सुसंवाद नसल्यामुळे त्याचा फटका उद्यमनगर परिसरातील रहिवाशांना बसलेला आहे तसेच रोज येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करूनही रस्ता होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com