रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर विजेता

रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर विजेता

Published on

swt235.jpg
93486
मुंबईः ‘चेसबेस इंडिया’चे संस्थापक सागर शहा यांच्यासोबत बाळकृष्ण पेडणेकर.

रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत
बाळकृष्ण पेडणेकर विजेता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचा सावंतवाडीतील राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने चेंबूर, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या चेंबूर जिमखाना राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. देशभरातील पाचशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. बाळकृष्णने उत्कृष्ट खेळ करत नऊ फेऱ्यांमध्ये सहा फेऱ्या जिंकल्या, तर दोन बरोबरीत सोडवून सात गुण केले. जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि करोडो बुद्धिबळप्रेमी पाहत असलेल्या यु ट्युबवरील बुद्धिबळ चॅनल ‘चेसबेस इंडिया’चे संस्थापक आणि इंटरनॅशनल मास्टर सागर शहा यांनी बाळकृष्णचे कौतुक करतानाच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाळकृष्णला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्ण हा येथील मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आणि उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांचा सुपुत्र आहे. सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
................
swt236.jpg
93487
कुडाळ ः पोलिसांनी संशयितांसह मुद्देमाल ताब्यात घेतला.

दारू वाहतुकीवर कु़डाळात कारवाई
ओरोस, ता. २५ः जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलिस ठाणे हद्दीतील दांड्याचे गाळू येथे मुंबई-गोवा महामार्गाजवळ गोवा बनावटीच्या दारुसह एक लाख ८५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता. २२) सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आली. याप्रकरणी संशयित मिथून मंगेश फाटक (वय २९, रा. कट्टा, ता. मालवण), महेश शामराव महांकाळ (वय ५०, रा. तोंडवळी ता. मालवण) या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून गोवा बनावटीची दारू व दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलिस हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार, पोलिस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केली.

Marathi News Esakal
www.esakal.com