भजन स्पर्धेचे ''अर्धशतक'' कौतुकास्पद

भजन स्पर्धेचे ''अर्धशतक'' कौतुकास्पद

Published on

swt2310.jpg
93532
कुडाळ ः कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित (कै.) अॅड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन करताना दत्ता सामंत व मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)

भजन स्पर्धेचे ‘अर्धशतक’ कौतुकास्पद
दत्ता सामंतः कुडाळात अॅड. अभय देसाई भजन स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः कुडाळेश्वर उत्सव मंडळाने गेली पन्नास वर्षे भजन स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलेले सातत्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी कौतुक केले. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित (कै.) अॅड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (ता. २२) कुडाळेश्वर मंदिर येथे झाले. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. दोन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या भजन स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून तीस भजनी मंडळे सहभागी झाली आहेत.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळामार्फत दरवर्षी नवरात्रोत्सवात (कै.) अॅड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या भजन स्पर्धेचे पन्नासावे वर्ष असल्याने श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. नवरात्रीनिमित्त मंदिरात देवीची प्रतिष्ठापना केली आहे. व्यासपीठावर पांडुरंगाची मूर्ती देखील विठू नामाचा गजर करत स्थापन करण्यात आली. गेल्या पन्नास वर्षांत मंडळाचे जे कार्यकर्ते दिवंगत झाले, त्यांना एका अभंगातून आदरांजली वाहण्यात आली. या सगळ्या वातावरणात या सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी पखवाज वादक आनंद मोर्ये आणि त्यांच्या जिल्हाभरातील साठ शिष्यांनी पखवाज वादन करून उपस्थित भजनरसिकांची मने जिंकली. व्यासपीठावर संजय पडते, अरविंद शिरसाट, राहुल पाटणकर, अमेय देसाई, विलास कुडाळकर, अरविंद करलकर, विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, श्रुती वर्दम, परीक्षक शहाजहान शेख, संजय दळवी, किशोर काणेकर उपस्थित होते. दत्ता सामंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धेचे उदघाटन झाले.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘एखादी स्पर्धा सतत पन्नास वर्षे सुरू ठेवणे सोपी गोष्ट नाही. कुडाळेश्वर मंडळाचे नाव राज्यात पोहोचलेले आहे. आज देखील पखवाज वादनाचा सुंदर कार्यक्रम बघता आला. कुडाळेश्वर मंडळाचा आदर्श घेऊन घुमडे गावामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या मंडळासाठी आवश्यक सहकार्य आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल.’’
यावेळी महेश कुडाळकर, श्रीकृष्ण कुंटे, सुरेश राऊळ, सुशांत राऊळ, केदार राऊळ, नंदू कुंटे उपस्थित होते. स्वागत किशोर काणेकर यांनी, सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. आभार महेश कुडाळकर यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तुळस यांचे भजन सादर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com