नाणीज
नाणीजचा विद्यार्थी
कॅरम स्पर्धेत प्रथम
रत्नागिरी ः येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत तालुक्यातील नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिरच्या यश मोहिरेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. मुख्याध्यापिका सावंतदेसाई, क्रीडाशिक्षक माने व अन्य सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक केले आहे.
कुर्ली किनारी स्वछता
रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील कुर्ली समुद्रकिनारी शनिवारी (ता. २०) स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय आणि भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा (इनकॉईस), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि एसकेएसव्ही महाविद्यालयातर्फे ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, लांजा येथील एसकेएसव्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण व तटरक्षक दलाचे अधिकारी, कुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच राधिका साळवी, ग्रामस्थ, विद्यार्थी, मच्छीमार उपस्थित होते.
समृद्धी कदमचे
वेटलिफ्टिंगमध्ये यश
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत वेटलिफ्टिंग या क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील बसणी येथील जी. एम. शेटये हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५, बसणीचे माजी सचिव व नालंदा प्रतिष्ठानचे विद्यमान कोषाध्यक्ष योगेश कदम यांची कन्या समृद्धी कदम हिने वेटलिफ्टिंगच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावून हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले. समृद्धीची पुढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिडे आदिवासीवाडी
शाळेत मूल्यमापन चाचणी
मंडणगड ः केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी तिडे आदिवासी शाळेत झाली. या चाचणीसाठी वाडीतील तीन असाक्षरांची नोंद करण्यात आली होती. या तिन्ही असाक्षरांनी परीक्षा केंद्रावर येऊन चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण असाक्षर यांचे मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. असाक्षरांना शिकवण्याचे काम स्वयंसेवक देविका हिलम यांनी केले. पर्यवेक्षक म्हणून शाळेतील सहशिक्षिका सोनाली लहाने यांनी काम पाहिले. केंद्रसंचालक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नीलेश लोखंडे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.