-जनतेच्या प्रश्नापेक्षा पालकमंत्र्यांची चमकुगिरीच

-जनतेच्या प्रश्नापेक्षा पालकमंत्र्यांची चमकुगिरीच

Published on

-rat२३p२९.jpg-
२५N९३६२७
रत्नागिरी ः स्मार्ट मीटरविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महावितरण कंपनीवर मोर्चा काढला.
----
स्मार्ट मीटरविरोधात मोर्चा...लोगो

जनतेच्या प्रश्नापेक्षा पालकमंत्र्यांची चमकूगिरीच
विनायक राऊत यांची टीका; स्मार्ट मीटरची मोहीम तत्काळ थांबवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अदाणी ग्रुपकडून जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे. हे मीटर बसवल्यानंतर दुप्पट वीजबिल येते. जी एजन्सी नेमली आहे ती चोरासारखी गुपचूप येऊन मीटर बदलून जाते. स्मार्ट मीटर दिसायला जेवढा चांगला आहे तेवढाच त्याची लबाडीसुद्धा अधिक आहे. जनतेची लूट सुरू असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री फक्त चमकूगिरी करण्यात व्यस्त आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही घेणे देणे नाही. तत्काळ ही मीटर बसवण्याची मोहीम रद्द करावी अन्यथा दोन्ही पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढून स्मार्ट मीटर फोडू, असा इशारा उबाठा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिला.
स्मार्ट मीटरविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महावितरण कंपनीवर मोर्चा काढला. हा मोर्चा माजी खासदार विनायक राऊत यांच्या नाचणे येथील संपर्क कार्यालयातून घोषणा देत महावितरण कंपनीवर धडकला. महावितरणच्या आवारातच त्याचे सभेमध्ये रूपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व उबाठा सचिव विनायक राऊत, उपनेते बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवी डोळस, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आदींनी केले.
विनायक राऊत म्हणाले, खऱ्या अर्थाने या स्मार्ट मीटरबाबतचा पहिला आवाज दोन वर्षांपूर्वी मी या रत्नागिरीमध्ये उठवला होता. त्या वेळेला मी खासदार होतो; परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांपैकी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यात सरकारने स्मार्ट मीटर बनवण्यासाठी प्राधान्याने घेतले. आम्ही सुरुवातीपासून याला विरोध केला आणि आजही विरोध कायम आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जनतेच्या आणि कोकणवासियांच्या हितासाठी पालकमंत्री नेमले आहेत; परंतु यांना जनतेच्या प्रश्नाचे काही घेणे देणे नाही. दोन्ही पालकमंत्री फक्त चमकूगिरी करत आहेत. स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तत्काळ रद्द करावे अन्यथा दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांच्यासमोर स्मार्ट मीटर फोडू, असा इशारा राऊत यांनी दिला.

चौकट
...अन्यथा कार्यालयही फुटेल
मोर्चानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता माने यांना भेटले. त्या वेळी मुख्य अभियंता उपस्थित नव्हते. त्यामुळे विनायक राऊत संतापले. स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तत्काळ थांबवा अन्यथा स्मार्ट मीटरबरोबर कार्यालयदेखील फोडू. सुमारे १० हजार लोकांनी पत्र देऊन स्मार्ट मीटरला विरोध केला आहे. चार दिवसात २५ हजार पत्र ग्राहकांकडून घेऊन जनमताचा विचार करून स्मार्ट मीटर बसवणे बंद करावे लागेल, असा इशारा माजी आमदार बाळ माने यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com