गोव्यात आयुर्वेदिक पर्यटनाला वाव

गोव्यात आयुर्वेदिक पर्यटनाला वाव

Published on

swt249.jpg
93858
धारगळ (गोवा)ः जागतिक आयुर्वेद दिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना राज्यपाल कुशापती राजू. सोबत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर.

गोव्यात आयुर्वेदिक पर्यटनाला वाव
राज्यपाल कुशापती राजूः आयुर्वेद दिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ः समुद्रकिनारे, नद्या, डोंगर, वनराई, शेती अशा अनेक गोष्टी एकाच ठिकाणी असल्याने आरोग्य आणि आयुर्वेदिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र होण्याची गोव्याकडे क्षमता आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन भविष्यात आयुर्वेदिक संस्थानच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे आवाहन गोव्याचे राज्यपाल कुशापती राजू यांनी केले. आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक देशांनी हे महत्त्व स्वीकारले आहे. त्यामुळे यात आणखी संशोधन होणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय आयुर्वेद संस्थानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री प्रातापराव जाधव, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रवीण आर्लेकर, राजेश कोटी, अधिष्ठाता सुजाता कदम, केंद्रीय आयुर्वेद संस्थानचे संचालक पी. के. प्रजापती आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘आयुर्वेद भारताची प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेद संपूर्ण सृष्टीला चेतना देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. मला लोकाच्या कृपेने या मंत्रालयाची काही काळ सेवा करण्याची संधी मिळाली, ते काम माझ्या जीवनात महत्त्वपूर्ण व समाधानकारक आहे, असे मी मानतो. आयुषच्या बळावर आम्ही ''स्वस्त भारत, समृद्ध भारत''ची घोषणा करू शकलो. आयुर्वेद जीवनाचा आत्मा आहे व तोच समृद्ध जीवनाचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे.’’
मंत्री जाधव यांनी, आयुर्वेद केवळ रोगचिकित्सा नाही तर सृष्टीलाही वाचवणे व औषधी वनस्पतीची उत्पादन क्षमता वाढवून त्यांचे सांगोपग करणे, हेही काम देशभर आयुर्वेद संस्थान करीत आहे. गोव्यात आयुर्वेद संस्थानचे उपक्रम राबविण्यास चांगली संधी आहे. गोवा सरकारने त्यासाठी आणखी थोडी जागा उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
प्रास्ताविक संचालक पी. के. प्रजापती यांनी केले. डॉ. बनवारीलाल गौर अष्ठविसिद्ध पी, एन मुसा व वैद्य भावना पराशर यांना राज्यपालांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रुपये, प्रमाणपत्र, मानपत्र, मानचिन्ह, शाल व कलश देऊन भारत सरकारचा ‘भारतीय आयुर्वेद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन जुही मल्होत्रा यांनी केले. आभार अधिष्ठाता सुजाता कदम यांनी मानले.

चौकट
आयुर्वेद संस्थानला गोव्यात जागा देऊ
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘‘आज आपल्या देशाला आयुर्वेदामुळेच ‘अच्छे दिन’ आले आहेत. गोवा सरकार आयुष मंत्रालयाला नेहमीच सहकार्य करीत आले आहे. यापुढे जागा कमी पडत असल्यास व्यवस्था केली जाईल. धारगळच्या या महाविद्यालयात आठशेपेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी ‘ओपीडी’ सेवा घेतात. केवळ चार वर्षांत एवढी आघाडी येथील डॉक्टर व व्यवस्थापनाने घेतलेल्या मेहनतीमुळेच शक्य झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com