प्रवास खडतर
-rat23p19.jpg-
P25N93568
उज्ज्वला धामणस्कर
-----
नवदुर्गा---लोगो
अयोध्येचा प्रवास खडतर; पण आनंददायी
उज्ज्वला धामणस्कर ः कारसेवक म्हणून पहिलीच महिला, कलाक्षेत्रात चमकदार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः अयोध्येला जाण्यासाठी तुम्ही माणिकपूरमधून ट्रेनने निघा, तोपर्यंत आराम करा. रात्री जंगलातून पाठच्या रस्त्याने जाऊन माणिकपूर स्टेशनजवळच उभे राहिलो. स्टेशनवर बंदोबस्त होता. रात्र असल्याने शिथिलता होती. आम्ही एकेक करून ट्रेनमध्ये जाऊन बसलो आणि निश्चिंत झालो. त्या वेळी कारसेवा म्हणजे काय? हे देखील माहिती नव्हते. १९९० मध्ये राजापुरातून एकटी महिला कारसेवक म्हणून होते, असे शिक्षकसंघाच्या गुणवंत पुरस्कारप्राप्त पदवीधर शिक्षिका उज्ज्वला धामणस्कर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
उज्ज्वला यांचे पूर्वाश्रमीचे नाव उज्ज्वला शेट्ये. त्यांचे शिक्षण हे राजापूर हायस्कूल आणि अध्यापक विद्यालय येथे झाले. शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबर सांस्कृतिक, क्रीडा व अन्य सामाजित कार्यात सहभाग, क्रीडाक्षेत्रातील खो-खो राज्यपातळीपर्यंत महिला खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी त्यांनी केली.
१९९० ला पहिली कारसेवा झाली, त्या वेळी त्या राजापूर येथे होत्या. कारसेवा म्हणजे काय, ती का करायची? काही माहिती नव्हतं. कारसेवक म्हणजे अयोध्येला जायचं. त्यानंतर पुढची माहिती घेऊन मागचा-पुढचा विचार न करता मी सरळ होकार दिला. राजापुरातून १० पुरुष आणि फक्त तू एकटी महिला आहेस चालेल ना! मी लगेच हो म्हटलं, घरी आले. मी आई-बाबांना म्हटलं, मी अयोध्येला निघाले. तेही चकीत होऊन पाहू लागले; पण माझ्या विश्वासापुढे त्यांचे काहीच चालले नाही. राजापुरातून रत्नागिरीत दाखल झालो. तिथून ट्रकमधून मुंबईला गेलो. तिथून अयोध्येचा प्रवास सुरू झाला. अयोध्येच्या अगोदर ३० किमी मागे माणिकपूर गावात आम्हाला पोलिसांनी पुढे जायचं नाही, असे सूचित केले. माणिकपूर येथे उतरवल गेलं आणि बंदिस्त गोदाम होत तिथे ठेवण्यात आले. आमचा जय श्रीरामाचा जयघोष चालू होता; मात्र याचा सुगावा पोलिसांना लागला की, आम्ही परत ट्रेनने अयोध्येकडे निघालो आहोत. त्यामुळे अयोध्येच्या आधी १० किलोमीटरवर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. विनंती केल्यानंतर आम्हाला मुंबईपर्यंत सोडण्यात आलं; पण कारसेवक म्हणून त्या वेळचं स्वप्न पूर्ण होताना पाहताना मनाला खूप खूप आनंद झाला असल्याचे धामणस्कर यांनी सांगितले.
चौकट
नारायणी भगिनी मंडळात प्रवेश
त्यानंतर २००७ मध्ये भारतीय-कोकणी संस्कृतीचे प्रबोधन करणारे ‘साजरे करूया सण संस्कृतीचे’ या नारायणी भगिनी मंडळात पदार्पण केले आणि तिथूनच त्यांनी त्यांची प्रत्येक कला जोपासली.
------
चौकट
संगीत नाट्यस्पर्धेतही सहभाग
२०१३ ला धामणस्कर यांना शिक्षकसंघातर्फे गुणवंत शिक्षिका म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीराम मंदिर येथे फुगडी स्पर्धेत व राधाकृष्ण मंदिर येथे फुगडी स्पर्धेत उत्कृष्ट फुगडी सादरीकरण म्हणून सोन्याची नथ देऊन सत्कार झाला. मिसेस कोकण सुंदरीमध्ये बेस्ट टॅलेंट व बेस्ट रनरप म्हणून बक्षीस मिळले. शासनाच्या संगीत नाट्यस्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.