मनोज बांदिवडेकर रील स्पर्धेत प्रथम
swt2411.jpg
93868
सावंतवाडीः घरगुती गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित जावेद शेख, प्रा. रुपेश पाटील आदी.
मनोज बांदिवडेकर रील स्पर्धेत प्रथम
सावंतवाडीतील स्पर्धाः ‘मल्लसम्राट’, सावली फाउंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित ‘घरगुती गणपती सजावट जिल्हास्तरीय उत्कृष्ट रील मेकिंग’ स्पर्धेत निरवडे येथील मनोज बांदिवडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पारितोषिक वितरण समारंभ कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘मल्लसम्राट’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सेक्रेटरी ललित हरमलकर, सावली फाउंडेशनच्या अध्यक्ष सावली पाटकर, सेक्रेटरी प्रा. सचिन पाटकर, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या सहसेक्रेटरी फिजा मकानदार उपस्थित होते.
या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परीक्षकांच्या निरीक्षणानंतर उत्कृष्ट रील सादर करणाऱ्या विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम मनोज बांदिवडेकर (निरवडे, कोकण रेल्वे प्रदर्शन), द्वितीय महेंद्र पालव (माडखोल, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा-रुग्णवाहिका प्रदर्शन), तृतीय शुभम जाधव (निरवडे), उत्तेजनार्थ किरण आकेरकर (आकेरी, श्रीकृष्ण-नरकासुर युद्ध) आणि यश सावंत व रोहित जाधव (संयुक्त सादरीकरण) यांना देण्यात आले.
या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेते निवडताना दोन्ही संस्थांच्या मान्यतेने व सर्व परीक्षकांच्या संमतीने पारदर्शक निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी प्रा. पाटील, जावेद शेख यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कामाक्षी महालकर, फातिमा मकानदार, भाविका कदम, श्रुती सावंत, नासीर मकानदार, नागेश सूर्यवंशी, कृष्णा हरमलकर, बुधाजी हरमलकर, दशरथ गोंद्याळकर, गौरव कुडाळकर, गणेश राऊळ, संकेत माळी, योगेश बेळगावकर, देवेश पालव, साबाजी परब, दीपाली राऊळ, मिताली राऊळ, संचिता केनवडेकर, सान्वी बिद्रे आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन कामाक्षी महालकर यांनी केले. आभार प्रा. पाटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थांनी अथक परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.