रायफल स्पर्धेत प्रसाद कोलते द्वितीय क्रमांक
- rat२४p८.jpg-
२५N९३७९६
प्रसाद कोलते
----
रायफल स्पर्धेत प्रसाद कोलते द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २४ : येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी प्रसाद अमर कोलते याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये रायफल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा श्री वालावलकर जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण येथे पार पडली. या स्पर्धेत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील ७ वी अ मधील विद्यार्थी प्रसाद अमर कोलते याने चमकदार कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये ओपन साइड रायफल स्पर्धेत एकूण २७० गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेचे प्राचार्य कुशाबा करे, पर्यवेक्षिका नम्रता गोखटे, मराठा मंदिर संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक-पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.