विशेष शिक्षकांचे प्रथमच केंद्रस्तरावर समायोजन
-rat२४p९.jpg-
२५N९३८२५
रत्नागिरी ः मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे विशेष शिक्षकांना आदेश व शालार्थ आयडी प्रमाणपत्रे देताना. शेजारी किरण लोहार, संदेश कडव आदी.
----
विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन
राज्यातील पहिली जिल्हा परिषद; नवरात्रोत्सवात निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४२ विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन केले आहे. ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासननिर्णयानुसार ही कार्यवाही करण्यात आली. हे आदेश व शालार्थ आयडी प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्या हस्ते विशेष शिक्षकांना प्रदान करण्यात आली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सूचनेनुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या सहकार्याने विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, दर्जेदार व सुयोग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी समायोजनाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना वेतनही लवकरच अदा केले जाणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश रानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षणविस्तार अधिकारी संदेश कडव तसेच सर्व विशेष शिक्षक उपस्थित होते. या निर्णयामुळे गेली १७ वर्षे शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांना न्याय मिळाला आहे.
चौकट
तालुकानिहाय शिक्षक
तालुका* शिक्षकसंख्या
मंडणगड* २
दापोली* ५
खेड* ५
चिपळूण* ७
गुहागर* ३
संगमेश्वर* ५
रत्नागिरी* ७
लांजा* ४
राजापूर* ४
------
कोट
शासनाने दिलेल्या संधीचे विशेष शिक्षकांनी मेहनत करून सोने करावे तसेच आपल्या अनुभव व कौशल्याचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी योगदान द्यावे.
----
- किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.