गुहागर आयटीआयचा साहील जिल्ह्यात प्रथम

गुहागर आयटीआयचा साहील जिल्ह्यात प्रथम

Published on

-rat२४p१.jpg-
२५N९३७८९
गुहागर ः प्रथम क्रमांक मिळवलेल्या साहिलचा गौरव करताना मान्यवर.
------
गुहागर आयटीआयचा साहिल जिल्ह्यात प्रथम
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा; महाराष्ट्रातील १५ प्रशिक्षणार्थी अव्वल
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ : भारत सरकारने घेतलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (एआयटीटी) जुलै २०२५ मध्ये तालुक्यातील मायनाक भंडारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील साहिल गायकवाड या प्रशिक्षणार्थीने १०० टक्के गुण मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा गुहागर आयटीआयमधील साहिल गायकवाड हा जिल्ह्यातील एकमात्र प्रशिक्षणार्थी आहे. महाराष्ट्रातील १५ प्रशिक्षणार्थींनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. देशपातळीवरील या स्पर्धा परीक्षेला २० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीसाठी भारत सरकारतर्फे घेतलेल्या जाणाऱ्या या AITT स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे, ही अभिमानाची बाब असते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळणे सुलभ होते. गुहागरमधील मायनाक भंडारी आयटीआयमधून अव्वल गुणांनी उत्तीर्ण होणारा साहिल हा पहिला विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण मिळवणारा साहिल हा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्या या यशामुळे मायकान भंडारी आयटीआयच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साहिलने मिळवलेल्या यशाबद्दल आयटीआयमध्ये विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी गुण प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला तसेच त्याला प्रशिक्षण देणाऱ्या वीजतंत्री शिल्पनिदेशिका समिक्षा धामणस्कर, गणित, ईएस विषयाच्या निदेशिका शिल्पा भोसले, इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषयाचे दीपक धनावडे यांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी प्राचार्य प्रीतम शेट्ये, संस्था व्यवस्थापन समिती सदस्य समीर घाणेकर, गटनिदेशक पी. डी. गुरखे, ए. बी. गोरे, मुख्य लिपिक प्रदीप साळवी, ज्येष्ठ शिल्प निदेशक चंद्रशेखर शेंडे, आर. सी. मानकर, संजय पालकर आदी उपस्थित होते.
---------
कोट
इलेक्ट्रिकल इंजिनिअर (बीई) होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या अभ्यासक्रमात यशस्वी झाल्यास आयआयटी महाविद्यालयातून एमटेक पूर्ण करण्याचे स्वप्न आहे.
- साहिल गायकवाड

चौकट
१०० टक्के गुण मिळवलेले प्रशिक्षणार्थी
यवतमाळ शहरातील आयटीआयमधील ११ विद्यार्थी नोमन अहमद, वैष्णवी भोयर, महेश नेमाडे, विशाल माटलवाड, विशाल कदम, आदित्य सोळंखे, जुईनी राठोड, कार्तिक दिघे, साक्षी कलपांडे, रूचिता धुमणे, पायल मनवार (दारव्हा, जि. यवतमाळ), नम्रता खामकर, मुंबई उपनगरातील खासगी आयटीआयचा विद्यार्थी डॉन बॉक्सो, अफजल मुस्तफा कादरी, मंगलुरपीर (जि. वाशिम) मधील विद्यार्थिनी प्रतिज्ञा मनवार.

Marathi News Esakal
www.esakal.com