संक्षिप्त-सावंतवाडी येथे फुगडी महोत्सव
सावंतवाडी येथे
फुगडी महोत्सव
सावंतवाडी : महिलांच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी नवरात्रोत्सवानिमित्त ‘शिवकन्या’ या संस्थेतर्फे फुगडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शनिवारी (ता. २७) सायकांळी ५ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे होणार आहे. या स्पर्धेला उपस्थित प्रेक्षकांसाठी आकर्षक भेटवस्तू आणि लकी ड्रॉची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार व तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनामागे विद्या मादाकाचे, ॠतिका रांगणेकर, कृतिका कोरगावकर, ॠतुजा मोरे, श्रद्धा धारगळकर, कोमल म्हापणकर, मयुरी नेरुरकर या शिवकन्या संस्थेच्या सदस्यांचा सहभाग आहे. हा फुगडी महोत्सव महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जपण्याचा एक प्रयत्न आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
सावंतवाडीत आज
‘फार्मासिस्ट डे’
सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. २५) जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या या दिनाची उद्यासाठी थीम ''थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट'' अशी आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन शशिकांत यादव उपस्थित राहणार आहेत. तसेच भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात स्थानिक फार्मासिस्ट व्यक्तींचा सत्कार, फार्मासिस्ट ऑफ द इयर पुरस्कार वितरण, स्मरणिका अनावरण तसेच फार्मा लोगो, फार्मा घोषवाक्य, फार्मा पत्रके आणि फार्मा रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात येतील. या स्पर्धा फार्मसी विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील. विजेत्यांना मुख्य कार्यक्रमात गौरविले जाईल. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा. अंकिता नेवगी व प्रा. डॉ. प्रशांत माळी मेहनत घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.