-नैराश्य ही सुद्धा आरोग्यसमस्या
आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक----------लोगो
(१२ सप्टेंबर टुडे ४)
भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या २० टक्के आहे. असे असले तरी जागतिक पातळीपेक्षा भारतामध्ये नैराश्य व आत्महत्येचे प्रमाण जास्त असून, ते झपाट्याने वाढत आहे. ही एक गंभीर बाब आहे. आज या महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्यसमस्या समजून घेऊया. नैराश्यामुळे रुग्णाच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर परिणाम होतोच त्याचबरोबर रुग्णाला अपंगत्व येते, ज्याचा त्याच्या परिवारावर व वैद्यकीय व्यवस्थेवरही भार वाढत जातो.
- rat२५p२.jpg-
25N94089
- डॉं. श्रुतिका कोतकुंडे, चिपळूण
--
नैराश्य ही सुद्धा आरोग्यसमस्या
२०१५-१६च्या सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये दहात एक व्यक्तीला मानसिक आजाराची लागण झालेली आहे तर सहात एक व्यक्ती नैराश्याची बळी आहे. विविध ताण, निम्न सामाजिक स्तर, वाढीव जबाबदाऱ्या तसेच नैराश्य व आत्महत्या ही समस्या साथीसारखी पसरत आहे. १५ ते २९ वयोगटात मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण नैराश्य व आत्महत्या आहे. भारतात आत्महत्येचे प्रमाण जगापेक्षा जास्त आहे व याची बरीच कारणे आहेत. या तरुण वयोगटात नैराश्याचे कारण बहुतांशी शैक्षणिक ताण, कौटुंबिक ताण, अपुरी आरोग्ययंत्रणा, मानसिक आजाराबद्दल कलंक, आरोग्यधोरणे नीट राबवली न जाणे तसेच मानसिक आरोग्यासाठी अपुरा निधीही आहेत. मानसिक अनारोग्यामुळे आर्थिक नुकसानही होते कारण, मानसिक नैराश्यामुळे अपंगत्व येते कार्यक्षमता कमी होते व रुग्णासोबत परिवारावरही परिणाम होतो.
सतत उदास असणे, चिडचिड होणे, लक्ष एकाग्र न होणे, निर्णय घेता न येणे, सतत बडबड करत राहणे, आत्महत्येचे विचार ही प्रमुख भावनिक लक्षणे तर शारीरिक लक्षणे म्हणजे सतत थकवा वाटणे, झोप जास्त येणे किंवा कमी होणे, भूक कमी होणे तसेच लैंगिक इच्छा नसणे, विविध शारीरिक वेदना इत्यादी वरवर बघता ही लक्षणे सर्वसाधारण वाटल्यामुळे याकडे दुर्लक्ष होऊ शकते व निदान व उपचाराला विलंब लागू शकतो.
नैराश्यावर उपचार सोपेसहज करण्याजोगे व किफायतशीर आहेत. विविध प्रकारची उत्तम औषधे आता सहज उपलब्ध आहेत. औषधं, समुपदेशन व सामाजिक आधाराने रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. असे असले तरीही नैराश्याचे ८०% रुग्ण हे उपचाराअभावी राहतात. असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. या मागील प्रमुख अडसर म्हणजे मानसिक व्याधीकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन किंवा दुधाभाव. बहुतांशी रुग्ण वेडा, कमजोर अशी लेबल टाळण्यासाठी वैद्यकीय मदत टाळतात तसेच कुटुंबे ही बाब सामाजिक दडपणामुळे लपवतात. आजार ओळखला तरी मदत कुठून घ्यावी, हे सामान्यांना माहीत नसते तसेच गैरसमजुतीमुळे, कर्मठपणामुळे अंधश्रद्धा व तस्यम धार्मिक गोष्टींकडे जनमानसाचा कल जास्त असतो. यामुळे योग्य उपचार घेण्यामध्ये अडचण निर्माण हाऊ शकते. अपुरी वैद्यकीय व्यवस्था व अपुरे मनुष्यबळ ही आपल्याकडील एक मोठी समस्या आहे. शहरी भागात सेवा जास्त आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेने जिथे खरंतर सर्वात जास्त लोकवस्ती आहे त्यामुळे एक भौगोलिक असमानता निर्माण होते तसेच मानसिक आरोग्य व्यावसायिकांची विशेषतः मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांची तीव्र टंचाई आहे. गरिबी हा एक मोठा आर्थिक अडसर ठरतो कारण, जिथे हातावर पोट आहे तिथे उपचार दुर्लक्षित राहतात. निम्न आर्थिक स्तर हे मानसिक अनारोग्याचे कारणही आणि परिणामही आहे.
खासगी मानसिक सेवा सर्वसाधारण रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे ती परवडत नाही व उपचार पूर्ण घेता येत नाहीत, हा एक मोठा अडसर ठरतो. तसेच चांगल्या बऱ्याच सरकारी आरोग्यसेवा अपुऱ्या निधी व मनुष्यबळअभावी मानसिक सेवा देण्यास अक्षम ठरतात. मानसिक आरोग्य समस्यांची तीव्रता बघता सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत; परंतु असे दिसण्यात येते की, यंत्रणा, समाजिक घटक, आरोग्य यंत्रणा व शासकीय विभाग यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे सर्वदूर आरोग्यसेवा व्यवस्थित पोहोचत नाहीत. सरकारचा राष्ट्रीय मानसिक आरोग्य उपक्रम किंवा जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य उपक्रमांची सुरुवात सेवा सुरळीत करण्यासाठी व मानसिक आरोग्यसेवा शारीरिक आरोग्यसेवाबरोबर एकत्रितपणा देता येण्यासाठी सुरू झाली; परंतु हवा तो ताळमेळ या विविध विभागांमध्ये नसतो, असे आढळते. शासकीय रुग्णालयात अपुरी औषधव्यवस्था, अपुरे मनुष्यबळ व विविध विभागांमध्ये तारतम्य नसल्यामुळे सेवा अपुऱ्या आहेत व रुग्णसेवेपासून वंचित आहेत.
(क्रमशः)
(लेखिका सामाजिक काम करणाऱ्या मनोविकारतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.