आडाळी भूखंड प्रश्नी सर्वपक्षीयांची भेट घेणार

आडाळी भूखंड प्रश्नी सर्वपक्षीयांची भेट घेणार

Published on

swt258.jpg
94140
आडाळी एमआयडीस परिसराचे संग्रहीत छायाचित्र

आडाळी भूखंड प्रश्नी
सर्वपक्षीयांची भेट घेणार
कृती समिती ः ऑनलाईन प्रक्रिया रद्दवरुन निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. २५ ः मागील विधानसभा निवडणुकीत आडाळी एमआयडीसीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणाऱ्या कृती समितीने पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भूखंड वाटप प्रक्रिया रद्द करण्याचा मुद्दा जिल्ह्यातील सर्व पक्षापर्यंत पोहचविण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचे सरपंच पराग गांवकर, समिती सचिव प्रवीण गांवकर यांनी सांगितले.
आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आडाळी एमआयडीसीत उद्योग येण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात नाहीत. भूखंड मागणी केलेल्या उद्योजकांना भूखंड देण्यासाठी दिरंगाई केली जाते. उद्योजक स्नेही काम केले जात नाही. औद्योगिकदृष्ट्या असलेले आडाळीचे महत्व उद्योजकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, अशा मुद्यावरून समितीने मागील विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आणला. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी विविध आश्वासने दिली. मात्र, निवडणुकीला वर्ष झाल्यानंतर कुठल्याच राजकीय पक्षांनी आडाळीसाठी ठोस काम केल्याचे दिसून येत नाही. सत्ताधारी पक्षांनी आडाळीसाठी काम करणे अपेक्षित आहेच मात्र विरोधी राजकीय पक्षांनी देखील हा मुद्दा सतत चर्चेत ठेवणे आवश्यक आहे. आता तर उद्योजकांसाठी ऑनलाईन भूखंड वाटप प्रक्रियाच अचानक रद्द केली. त्यामुळे अनेक उद्योजकांचा हिरमोड झाला आहे. ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यासाठी समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांपर्यंत हा मुद्दा पोहचविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सर्व पक्षीयांनी येथील स्थानिकांना रोजगार देण्यासाठी शासन, महामंडळ यांच्याकडे प्रयत्न करावेत. भूखंड धारक उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधी यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे श्री. गांवकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com