सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देशपांडेंना स्नेहांजली पुरस्कार

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देशपांडेंना स्नेहांजली पुरस्कार

Published on

-ratchl२५२.jpg-
२५N९४१७१
प्रकाश देशपांडे
----
प्रकाश देशपांडेंना स्नेहांजली पुरस्कार
पुण्यात ६ ऑक्टोबरला वितरण ; एकमताने निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः प्रथितयश प्रकाशिका कै. सौ. अंजली घाटपांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘स्नेहांजली पुरस्कार’ प्रतिवर्षी ‘स्नेहल प्रकाशन’च्यावतीने देण्यात येतो. पुरस्काराचे हे २३वे वर्ष असून, यंदा हा सन्मान चिपळूण येथील संपादक, लेखक, कवी व थोर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांना देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे येथली एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. समारंभाला मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, भाजपचे माधव भांडारी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात आशुतोष बापट लिखित ‘साद मंदिरांची ओळख संस्कृतीची’ आणि वसुधा परांजपे लिखित ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन होणार आहे. स्नेहांजली पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. देगलूरकर असून, या समितीमध्ये डॉ. मुकुंद दातार, प्र. के. घाणेकर, आशुतोष बापट, अभय भावे आणि रवींद्र घाटपांडे यांचा समावेश आहे. समितीने एकमताने देशपांडे यांची निवड केली आहे.
देशपांडे चिपळूण येथील सुप्रसिद्ध साहित्यिक असून, गेल्या ४० वर्षांपासून साहित्य व सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांनी चिपळूण येथे साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलन यशस्वीपणे आयोजित केले आहेत. अथक परिश्रमाने प्राचीन वस्तूंचे संग्रहालय उभारले आहे. संपादक, लेखक आणि कवी म्हणूनही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. सध्या ते कोकणरत्ने ग्रंथावर काम करत आहेत तर त्वदियाय कार्याय हा गौरवग्रंथ त्यांच्यावर प्रकाशित झाला आहे. ते उत्तम व्याख्याते असून, त्यांनी विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली आहेत. एका अर्थाने चिपळूणच्या ‘सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक’ म्हणून त्यांची ओळख आहे. ते साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्यदेखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com