१७ विद्यार्थ्यांना दिली सहा लाखांची शिष्यवृत्ती
काही सुखद---लोगो
-rat२५p२३.jpg-
२५N९४१५२
राजापूर ः शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात बोलताना दिशा परिवारचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण.
---------
गरजूंना दिशा परिवारचा शैक्षणिक हात
१७ विद्यार्थ्यांना सहा लाखांची शिष्यवृत्ती ; स्वप्नांना आधार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः आर्थिक पाठबळाअभावी दहावी-बारावीनंतरचे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुणे येथील दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले जात आहे. विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तालुक्यातील १७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सुमारे ६ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळाअभावी इच्छुक शिक्षण घेणे शक्य नसलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षण घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
तालुक्यातील शिष्यवृत्तिधारक विद्यार्थ्यांना दिशा परिवाराच्या शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. दिशा परिवारचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण यांनी दिशा परिवार ही धर्मनिरपेक्ष संस्था असून, यामध्ये विद्यार्थी ही जात तर शिष्यवृत्ती देणे धर्म मानला जात आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून राजापूरच्या विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवताना सर्वांगसुंदर असे आपले चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन केले. या वेळी पुणे येथील बी. एल. स्वामी, दिशा परिवारचे कार्याध्यक्ष अरुण कुलकर्णी, राजापूरचे समन्वयक गजानन जोशी, अनंत रानडे, जी. आर कुलकर्णी, विकास जोशी आदी उपस्थित होते. या प्रसंगी गजानन जोशी, अनंत रानडे, बी. के. गोंडाळ, दीपक नाटेकर, सचिन रावण यांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथून कार्यक्रमाला उपस्थित अल्पना चव्हाण, अनंत राऊत आदींचा कांचन रानडे, गौरी जोशी, मालती गोंडाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
----------
चौकट
पाचशे विद्यार्थ्यांना कोटीची शिष्यवृत्ती
या प्रसंगी चव्हाण यांनी दिशा परिवारची स्थापना, उद्देश आणि आजपर्यंतचा प्रवास याचा आढावा घेतला. दात्यांच्या सहकार्याने दरवर्षी महाराष्ट्रातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दिशा परिवाराच्या सर्व विभागामध्ये राजापूरचे काम पहिल्या क्रमांकाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.